जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / इबोला सारख्या व्हायरसचा धोका, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू पाहा काय आहेत लक्षणं

इबोला सारख्या व्हायरसचा धोका, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू पाहा काय आहेत लक्षणं

मारबर्ग विषाणूचा धोका

मारबर्ग विषाणूचा धोका

कोरोना, इबोलापाठोपाठ आणखी एका Virus चा धोका, 12 जणांचा मृत्यू, पाहा काय आहेत लक्षणं

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचं सावट होतं ती स्थिती अत्यंत वाईट होती. कोरोनाची दोन वर्ष सर्वांसाठीच कठीण गेली आहेत. मात्र त्यातून सावरत असताना आता इबोलाचा धोका निर्माण झाला. त्यापाठोपाठ आणखी एका व्हायरसनं थैमान घातलं आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेत इक्वेटोरियल गिनीमध्ये मारबर्ग (Marburg Virus) व्हायरचा उद्रेक झाल्याने सात लोकांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी सांगितले की, रक्तस्रावी तापाने आणखी 20 जणांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, मारबर्ग (Marburg Virus) व्हायरसची लागण झालेल्या इतर तीन लोकांचा मृत्यू झाला होता आणि ते अत्यंत घातक इबोला सारख्या आजाराने ग्रस्त होते. हा व्हायरस इबोलासारखाच घातक असल्याचं WHO कडून सांगण्यात आलं आहे. जानेवारी महिन्यात पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती.

Oversleeping : जास्त झोपल्याने खरंच मधुमेह होतो का? सत्य वाचाल तर उडेल तुमची झोप!

 या व्हायरसने WHO चं आणि दक्षिण आफ्रिकेचं टेन्शन वाढवलं आहे. आधीच कोरोना, इबोलातून सावरताना आता हा नवा व्हायरस आला आहे. या व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यातून बरं होण्यासाठी जास्त वेळ लागतो. शिवाय इम्युनिटी कमी असेल तर मृत्यूचा धोका अधिक वाढतो त्यामुळे WHO ने चिंता व्यक्त केली आहे.

या व्हायरसमुळे युगांडामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. तर आजूबाजूच्या देशांना काळजी घेण्याचं आणि संशयित रुग्ण आढळल्यास तातडीने क्वारंटाइन करण्याचं आवाहन केलं आहे. या व्हायरसची प्रमुख लक्षणं कोणती आहेत समजून घेऊया.

बडबड करणाऱ्यापेक्षा शांत राहणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य राहते उत्तम, वाचा कमी बोलण्याचे फायदे

हा व्हायरस शरीरात 21 दिवस राहातो. खूप ताप, तीव्र डोकेदुखी आणि अचानक खूप थकवा जाणवू लागतो. तिसर्‍या दिवशी तीव्र जुलाब, पोटदुखी आणि गोळी येण्यास सुरुवात होते. मळमळ, उलट्याही होतात.

News18लोकमत
News18लोकमत

साधारण 7 दिवसांनंतर गंभीर लक्षणं दिसू लागतात. यामध्ये रुग्णांना रक्तस्त्राव होतो. मृत्यूची बहुतेक प्रकरणे लक्षणे दिसू लागल्यानंतर आठ ते नऊ दिवसांच्या दरम्यान होतात आणि सामान्यत: मोठ्या प्रमाणात रक्त कमी होणे हे यामागचं कारण आहे. हा आजार देखील संसर्गजन्य आहे. यामध्ये कपडे, पांघरुण किंवा एकमेकांच्या वस्तू वापरल्याने आजार होण्याचा धोका अधिक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात