मुंबई : कोरोनाचे दोन डोस आणि 2020 आणि 2022 पर्यंत सरलेली वर्ष फारच भयंकर होती. कोरोनाशी दोन हात करताना आरोग्यासोबत एक वेगळ्या प्रकारचे मानसिक ताणही होता. कोरोना कमी झाला म्हणून निर्धास्त झाले खरे मात्र कोरोना अजून गेला नाही. पुन्हा एकदा भारतात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. पुढचे 20 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दरम्यान जर वेगानं रुग्णसंख्या वाढत गेली तर चौथी लाट येऊ शकते असा अंदाज आहे. भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून पहिल्यांदाच शुक्रवारी सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्याची नोंद करण्यात आली. शुक्रवारी 6000 हून अधिक नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर तज्ज्ञांनी सांगितले की, येत्या 20 दिवसांत कोरोनाची प्रकरणे शिगेला पोहोचू शकतात. कोरोना तज्ज्ञ डॉ. रघुविंदर पाराशर यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरस पॅटर्न आणि आधी ज्या पद्धतीने कोरोना आणि त्याची लक्षणं दिसत होती हा फरक समजून घेणं आवश्यक आहे.
सावधान कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; आकडेवारीत चिंताजनक वाढ, पुन्हा मास्क सक्ती?व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही उपययोजना करू शकता. पुढचे २० दिवस कोरोनाचा पिक टाइम असेल ज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद होऊ शकते. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्या कमी येईल असा अंदाज आहे.
जीवशास्त्रज्ञ शेखर मांडे यांनी सोमवारी न्यूज 18 दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वेगानं रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका आहे. यावेळी रुग्णालयात खूप जास्त रुग्ण भरती झाले किंवा आधीच्या कोरोना लाटेत ज्या पद्धतीने मृत्यूदर होता तशी स्थिती आता नाही.
ECG, Blood testची गरजच नाही; हे मशीन फक्त 5 मिनिटांत सांगेल तुम्हाला हार्ट अटॅकचा किती धोकाकाय काळजी घ्याल? मास्कचा वापर नक्की करा, यामध्ये डिस्पोझेबल मास्क वापरा, ज्यामुळे तुम्हाला व्हायरसचा धोका कमी असेल गर्दीच्या ठिकाणी, मोठा कार्यक्रमांना जाणं टाळा, ज्यामुळे हा व्हायरस तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा धोका असेल अशी ठिकाणं टाळा सॅनिटायझरचा वापर करा, बाहेरून आल्यावर अंघोळ करा सॅनिटाझर वापरा