भोपाळ, 13 जून : भारतात अनलॉकमध्ये धार्मिळ स्थळं खुली करण्यात आली आहेत. मात्र धार्मिक स्थळांमध्ये जाण्यासाठी काही नियम आहेत. यापैकीच एक म्हणजे मंदिरात गेल्यानंतर हात लावून आपल्याला घंटा वाजवता येणार नाही. मात्र हात न लावताच तुम्हाला घंटा (contactless bell) वाजवता आली तर… हे कसं शक्य आहे, असं तुम्ही विचाराल? मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) पशुपतिनाथ मंदिरात (Pashupatinath Temple) अशी घंटा लावण्यात आली आहे. या घंटेला हात लावताच तुम्ही वाजवू शकता.
या घंटेमध्ये सेन्सर लावण्यात आलेत. प्रॉक्सिमिटी सेन्सरवर ही घंटा वाजते. म्हणजे तुम्ही जर या घंटेच्या जवळ गेलात तर ती घंटा आपोआप वाजू लागते. हे वाचा - पार्कात आलं भूत आणि करू लागलं जिम? फिटनेस फ्रिक भुताचा VIDEO VIRAL घंटेच्या खाली राहून फक्त हात वर करा घंटानाद होईल. घंटेला स्पर्श करण्याची अजिबात गरज नाही. तसंही या घंटेला कुणी स्पर्श करू नये, इतक्या उंचीवर ही घंटा बांधण्यात आलेली आहे.
नाहरू खान यांनी ही घंटा तयार केली आहे. नाहरू खान म्हणाले, “धार्मिक स्थळं सुरू होताच मशिदीतून अजान ऐकू येऊ लागलं. मंदिरातील घंटानादही ऐकायला यायला हवा, असं मला वाटलं आणि त्यामुळे मी घंटा तयार केली. संपादन - प्रिया लाड हे वाचा - महिला की पुरुष; CORONA सर्वात जास्त कुणाला बनवतोय आपला शिकार