JOIN US
मराठी बातम्या / देश / धक्कादायक घटना! वरिष्ठ IPS अधिकारी विजयकुमार यांची आत्महत्या, सर्व्हिस पिस्तूलने स्वतःवर झाडली गोळी

धक्कादायक घटना! वरिष्ठ IPS अधिकारी विजयकुमार यांची आत्महत्या, सर्व्हिस पिस्तूलने स्वतःवर झाडली गोळी

सूत्रांनी सांगितलं की विजयकुमार यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की, काही आठवड्यांपासून ते नीट झोपू शकले नाहीत. ते प्रचंड नैराश्यात होते.

जाहिरात

डीआयजी विजय कुमार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई 07 जुलै : तामिळनाडूचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी डीआयजी विजय कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या सर्व्हिस पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडली. या घटनेच त्यांचा जागीच मृत्यू झाला. आयपीएस अधिकारी विजय कुमार यांनी स्वत:वर गोळी का झाडली? हे अद्याप समजू शकलेलं नाही. 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी विजयकुमार यांनी पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. विजयकुमार यांनी कांचीपुरम, कुड्डालोर, नागापट्टिनम आणि तिरुवरूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केलं होतं. याच वर्षी, विजयकुमार यांनी कोईम्बतूर रेंजचे नवीन पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून पदभार स्वीकारला. याआधी त्यांची शेवटची पोस्टिंग चेन्नई येथे होती, जिथे त्यांनी पोलीस उपायुक्त म्हणून काम केलं. मौत अंत है नहीं…गाण्यावर रील पोस्ट करून खेळाडूने उचललं टोकाचं पाऊल आता ज्या कोइम्बतूर रेंजमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यामध्ये कोईम्बतूर ग्रामीण, तिरुपूर ग्रामीण, निलगिरी आणि इरोड जिल्ह्यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले आणि 6.45 च्या सुमारास त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये आले. त्यांनी त्याच्या सुरक्षा अधिकाऱ्याला (पीएसओ) आपलं पिस्तूल देण्यास सांगितलं. हे पिस्तून घेऊन ते कार्यालयातून बाहेर पडले. सकाळी 6.50 च्या सुमारास त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सूत्रांनी सांगितलं की विजयकुमार यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की, काही आठवड्यांपासून ते नीट झोपू शकले नाहीत. ते प्रचंड नैराश्यात होते. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या