जाहिरात
मराठी बातम्या / देश / मौत अंत है नहीं...गाण्यावर रील पोस्ट करून खेळाडूने उचललं टोकाचं पाऊल

मौत अंत है नहीं...गाण्यावर रील पोस्ट करून खेळाडूने उचललं टोकाचं पाऊल

गळ्याभोवती फास आवळल्याने त्याचा मृत्यू झाला.

गळ्याभोवती फास आवळल्याने त्याचा मृत्यू झाला.

मध्यरात्री अचानक कुटुंबीयांपैकी कोणालातरी जाग आली तेव्हा त्याच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला. खोलीत जाऊन पाहिलं असता तर…

  • -MIN READ Local18 Kanpur,Kanpur Nagar,Uttar Pradesh
  • Last Updated :

अखंड प्रताप सिंह, प्रतिनिधी कानपूर, 3 जुलै : तरुणांमध्ये नैराश्यातून आत्महत्येची प्रकरणं प्रचंड वाढली आहेत. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून राज्यस्तरीय कबड्डीपटूने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 25 वर्षीय विक्रांत उपाध्याय या तरुणाने पंख्याला लटकून आपलं आयुष्य संपवलंय. विक्रांतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये त्याने ‘मौत अंत है नहीं, तो मौत से भी क्यों डरें, ये जा के आसमान में दहाड़ दो…’ हे गाणं वापरलं होतं. हा व्हिडिओ पोस्ट केला त्याच रात्री त्याने फाशी घेऊन आत्महत्या केली.

News18लोकमत
News18लोकमत

विक्रांतने अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली होती. तो कानपूरच्या जीके मैदानावर मुलींना कबड्डीचे धडे द्यायचा. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी विक्रांतने आत्महत्या केली त्या दिवशी तो मित्रांसोबत फिरायला गेला होता. संध्याकाळी घरी आल्यावर त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक रील व्हिडिओ पोस्ट केली. त्यानंतर रात्री जेवून तो झोपला. मध्यरात्री अचानक कुटुंबीयांपैकी कोणालातरी जाग आली तेव्हा त्याच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला. खोलीत जाऊन पाहिलं असता, विक्रांतने चादरीच्या साहाय्याने पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. विंचू चावला…! पावसाळ्यात हैदोस, पोलिसांच्या डोक्याला ताप मध्यरात्री विक्रांतला पंख्याला लटकलेलं पाहून त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्काच बसला. विक्रांत जिवंत आहे, या आशेने त्यांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. मृतदेह खाली उतरवून कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी विक्रांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालातून त्याच्या गळ्याभोवती फास आवळल्याने विक्रांतचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, त्याचे कुटुंबीय सध्या काहीही बोलण्याचा मनस्थितीत नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात