JOIN US
मराठी बातम्या / देश / हे फक्त भारतात शक्य आहे! दफन करण्यासाठी मिळाली नाही जागा, अखेर ख्रिश्चन व्यक्तीवर हिंदू पद्धतीनं केले अंत्यसंस्कार

हे फक्त भारतात शक्य आहे! दफन करण्यासाठी मिळाली नाही जागा, अखेर ख्रिश्चन व्यक्तीवर हिंदू पद्धतीनं केले अंत्यसंस्कार

लॉकडाऊनमुळे लोकांना आपल्या प्रियजनांच्या अंत्यविधीसही जाण्याची संधी मिळत नाही आहे. मात्र रांचीमध्ये अशी एक घटना घडली ज्यानं सर्वांनाच थक्क केलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची, 01 मे : कोरोनामुळं सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळं लोकांना आपल्या प्रियजनांच्या अंत्यविधीसही जाण्याची संधी मिळत नाही आहे. मात्र रांचीमध्ये अशी एक घटना घडली ज्यानं सर्वांनाच थक्क केलं. हरमू नदीजवळ राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. मृत व्यक्ती ख्रिश्चन होती, मात्र त्यांना दफन करण्यासाठी स्मशानभूमी पोहचल्यावर त्यांना कळले की दफन करण्यासाठी जागा शिल्लक नाही आहे. अशा परिस्थितीत कुटूंबाला काय करावे कळले नाही. अखेर त्यांनी आपल्या वडिलाचे अंत्यसंस्कार हिंदू विधीप्रमाणे केले. 15 वर्षांपासून ख्रिस्ती धर्माचे अनुसरण करा मिळालेल्या माहितीनुसार, रशारन असे मृत व्यक्तीचे नाव असून ते गेल्या 15 वर्षांपासून ख्रिश्चन धर्माचे पालन करीत आहे. रशारन यांचा मुलगा फिलिप तुट्टी म्हणाला की, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये जात आहोत. वडिलांच्या निधनानंतर, चर्चच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला गेला. मात्र त्यांनी दफन करण्यासाठी जागा नसल्याचे सांगितले. त्यामुळं आम्ही हिंदू पद्धतीप्रमाणे देहाला अग्नी देण्याचा निर्णय घेतला. वाचा- कोरोनावर मोठ्या हिम्मतीनं केली मात, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं हिंदूंनी केली मदत जेव्हा फिलिप यांना वडिलांचा मृतदेह आपल्या गावी घेऊन जाणे शक्य झाले नाही, तेव्हा त्यांनी लोकांची मदत घेतली. कुटुंब आणि स्थानिक लोकांनी परस्पर संमतीने हिंदू पद्धतीनुसार देहाला अग्नी देण्याता आला. वाचा- चिकण, मटणसह सर्व गोष्टी घरपोच, असं कोरोनामुक्त झालं बारामती शहर लॉकडाऊनमुळे मोक्षही लांबणीवर लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्काराच्या प्रथा अजूनही बाकी आहे. लॉकडाऊनमुळं लोकांना आपल्या प्रियजनांच्या अस्थींचे विसर्जनही करता येत नाही आहे. सध्या सर्व अस्थी लॉकरमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. लखनऊच्या अशाच एका स्मशानात शेकडो अस्थी लॉकरमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. येथील केअटरटेकर अरविंद यांनी न्यूज 18 ला सांगितले की, असा प्रकार पूर्वी कधीच घडला नाही. अरविंद यांनी सांगितले की, ‘हिंदू प्रथेनुसार, अस्थी या गंगा नदीत विसर्जित केल्या जातात. मात्र लॉकडाऊनमुळे आता लोकांना कुठेही जाता येत नाही आहे. सध्या लखनऊ येथील लॉकरमध्ये जवळजवळ 150 ते 200 अस्थी आहेत. वाचा- पाकमध्ये आणखी एका हायप्रोफाईल नेत्याला कोरोना, इम्रान खान यांची घेतली होती भेट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या