पाकमध्ये आणखी एका हायप्रोफाईल नेत्याला कोरोना, इम्रान खान यांची घेतली होती भेट

पाकमध्ये आणखी एका हायप्रोफाईल नेत्याला कोरोना, इम्रान खान यांची घेतली होती भेट

पाकमध्ये कोरोना संसर्गाची एकूण प्रकरणे जवळजवळ 17 हजारांवर पोहचली आहेत. यातच आता आणखी एक नेत्याला कोरोना झाला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 1 मे : कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच जात आहे. सामान्य लोकांपासून, अभिनेते आणि नेते सगळेच याला बळी पडले आहेत. आता पाकिस्तानच्या संसदेच्या अध्यक्षांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अध्यक्ष असद कैसर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्य म्हणजे असद कैसर यांनी 25 एप्रिल रोजी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली होती. असद कैसरचा मुलगा आणि मुलगी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर कैसरने स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. कोरोनाची लागण होताच त्यांनी पाकिस्तानच्या जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले.

असद कैसर यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती देत, मी स्वत: ला क्वारंटाइन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ताप विषाणूची लक्षणे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान याआधी त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. असद कैसर पुढे म्हणाले की, "आज जेव्हा मी पुन्हा चाचणी केली तेव्हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. घरी राहून काळजी घेण्याचा मला सल्ला देण्यात आला आहे. माझा मुलगा आणि मुलगी देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आहेत." यापूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील राज्यपालांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले होते.

वाचा-लॉकडाऊनचा दुसरा टप्पाही संपणार, कोरोनाची भारतात काय आहे सद्यस्थिती?

वाचा-लॉकडाऊन हटवा नाहीतर..., या देशात बंदूक घेऊन रस्त्यावर उतरले नागरिक

राज्यपाल इमरान इस्माईल यांनी सोमवारी रात्री उशिरा ट्विट करून ही माहिती दिली. वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, पाकमध्ये कोरोना संसर्गाची एकूण प्रकरणे जवळजवळ 17 हजारांवर पोहचली आहेत.

वाचा-देशाची रक्षा करणाऱ्या कोरोना योद्धांवर मोठं संकट, 40 पोलिसांची चाचणी पॉझिटिव्ह

इम्रान खान यांनीही केली होती कोरोना चाचणी

पाकिस्तानामधली मोठी स्वयंसेवी संघटना असलेल्या इधी फाऊंडेशनच्या प्रमुखांनी इम्रान खान यांची भेट घेतली होती. नंतर त्यांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा झाली होती. नंतर इम्रान खान यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हापासून ते आयसोलेशनमध्येच राहत होते. इम्रान खान यांची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री झफर मिर्झा यांनी दिली होती.

First published: May 1, 2020, 9:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading