जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कोरोनावर मोठ्या हिम्मतीनं केली मात, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं

कोरोनावर मोठ्या हिम्मतीनं केली मात, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं

कोरोनावर मोठ्या हिम्मतीनं केली मात, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं

सांगली, 01 मे : संपूर्ण देशात सध्या कोरोना संसर्गाचा हाहाकार सुरू आहे. देशात सर्वाधित रुग्ण हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. अशात या रोगामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले. पण सांगलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला कोरोनाच्या संसर्गातून मुक्त झाली पण त्यानंतर हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. इस्लामपूरमधील कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झालेल्या 62 वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाचे जे पहिले रुग्ण इस्लामपूरात सापडले होते त्यामध्ये या महिलेचा समावेश होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

सांगली, 01 मे : संपूर्ण देशात सध्या कोरोना संसर्गाचा हाहाकार सुरू आहे. देशात सर्वाधित रुग्ण हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. अशात या रोगामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले. पण सांगलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला कोरोनाच्या संसर्गातून मुक्त झाली पण त्यानंतर हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. इस्लामपूरमधील कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झालेल्या 62 वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाचे जे पहिले रुग्ण इस्लामपूरात सापडले होते त्यामध्ये या महिलेचा समावेश होता. 10-12 दिवसांपूर्वीच कोरोनावर मात करुन ती घरी इस्लामपूरमध्ये परतली होती. पण गुरुवारी रात्री त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं तातडीने त्यांना उपचारासाठी सांगली इथं दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांचं निधन झालं. महिलेचा मृत्यू हा हृदयविकाराच्या धक्यानं झाल्याची माहिती प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी दिली आहे. खरंतर कोरोनामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले. या मृत महिलेने कोरोनावर यशस्वी मात केली. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. त्यांच्या अशा जाण्यानं संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. देशाची रक्षा करणाऱ्या कोरोना योद्धांवर मोठं संकट, 40 पोलिसांची चाचणी पॉझिटिव्ह दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दर 15 दिवसांनंतर दुप्पट वाढ होत आहे. लॉकडाऊन करण्यापूर्वी अवघ्या 4.4 दिवसात दुप्पट होत होती. तर 27 एप्रिल पर्यंत ही वेग 10.77 दिवस होती. दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि ओडिशामध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथे 11-15 दिवसांत रुग्णांची गती दुप्पट होत आहे. तेलंगणामध्ये रुग्णांच्या दुप्पट होण्याचे प्रमाण 58 दिवसात सर्वात कमी आहे. त्यानंतर केरळ उत्तराखंड हरियाणाचा क्रमांक लागतो. पाकमध्ये आणखी एका हायप्रोफाईल नेत्याला कोरोना, इम्रान खान यांची घेतली होती भेट महाराष्ट्र आणि गुजरातमधील परिस्थिती सर्वात वाईट आहे. या दोन राज्यात रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील ताज्या आकडेवारीनुसार रुग्णांची संख्या 10 हजारच्या वर गेली आहे. तर गुजरातमध्ये 4082 रुग्ण आहेत. देशातील या दोन राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 60 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 432 लोकांचा मृत्यू झाला. तर गुजरातमधील मृतांची संख्या 197वर पोहोचली आहे. आपल्या पिल्ल्यांसोबत जात होता हत्ती समोरून आली दुचाकी पुढे काय झालं पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात