JOIN US
मराठी बातम्या / देश / 21 जूनला 'या' कारणामुळे ठीक होणार कोरोना? चेन्नईच्या शास्त्रज्ञाचा अजब दावा

21 जूनला 'या' कारणामुळे ठीक होणार कोरोना? चेन्नईच्या शास्त्रज्ञाचा अजब दावा

चेन्नईच्या एका वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, कोरोना लवकरच नष्ट होईल आणि याचे कारण एक नैसर्गिक प्रक्रिया असेल.

जाहिरात

पावसाळ्यात वाढणाऱ्या आर्द्रतेवर तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. आयआयटी बॉम्बेच्या म्हणण्यानुसार, वाढत्या आर्द्रतेमुळे कोरोना विषाणू आणखी धोकादायक होईल. तर काही तज्ज्ञांच म्हणणं आहे की, आर्द्रतेमुळे कोरोनाचा संसर्गाचा धोका कमी होईल. खोकल्यामुळे आणि शिंकल्यामुळे थेंब बाहेर पडतात. आर्द्रतेमुळे हे थेंब मोठे होतात आणि खाली पडतात. याचा तसा शरीरावर परिणाम कमी होतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 15 जून : देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत अद्यापही औषध किंवा लस शोधता आलेली नाही आहे. यातच आता एका शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की सूर्यग्रहणामुळं कोरोना ठिक होऊ शकतो.  रविवारी 21 जून रोजी ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील काही भागातून दिसणार आहे. दरम्यान सूर्यग्रहणामुळं कोरोना बरा होऊ शकतो असा दावा चेन्नईचे अणु आणि पृथ्वी वैज्ञानिक (Nuclear and Earth Scientist) केएल सुंदर कृष्णा यांनी केला आहे. केएल सुंदर यांच्या मते कोव्हिड-19 हा रोग गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या एका सूर्यग्रहणाशी (solar eclipse) संबंधित आहे. त्यामुळं डॉ. सुंदर कृष्णा यांचे म्हणणे आहे की, 26 डिसेंबरच्या या ग्रहणानं सूर्यमालेत ग्रहांची संरचना बदलली. वाचा- ‘या’ देशाच्या लसीचं ट्रायल यशस्वी, 14 दिवसांत टळू शकतो मृत्यूचा धोका एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, सुंदर कृष्णा असेही म्हणाले की, ‘हा बदल चीनमध्ये प्रथम पाहिला गेला. हा बदल एखाद्या प्रयोगामुळे किंवा हेतूपुरस्सर प्रयत्नांचा परिणाम आहे. त्यामुळं असा विश्वास आहे की, येत्या सूर्यग्रहण एक टर्निंग पॉइंट असल्याचं सिद्ध होऊ शकतो. कृष्णा यांनी दावा केला आहे की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे लोकांना यावर घाबरून जाण्याची गरज नाही. सूर्यप्रकाश आणि सूर्यग्रहण या प्राणघातक विषाणूचा एक नैसर्गिक उपचार म्हणून सिद्ध होईल. वाचा- कोरोनाचा भयानक अवतार, बरा झालेला तरुण पुन्हा निघाला कोरोना पॉझिटिव्ह 21 जून कंकणाकृती सूर्यग्रहण रविवारी 21 जून रोजी ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील काही भागातून दिसणार आहे. उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीमध्ये दिसणार आहे. मुंबईतून हे सूर्यग्रहण सकाळी 10 वाजून 1 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 28 मिनिटांपर्यंत दिसणार आहे. सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी कधीही पाहू नये. त्यामुळे दृष्टीस इजा होते. सूर्यग्रहण नेहमी ग्रहणचष्म्यातूनच पहावे. वाचा- आता कोरोना संशयित रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी असणार नवीन नियम

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या