नवी दिल्ली, 15 जून : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) कोव्हिड-19 संशयित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यानुसार आता कुटुंबाला शव देण्याआधी प्रयोगशाळेतील नुकालांची गरज लागणार नाही.
मंत्रालयाने रविवारी दिल्ली सरकारला पत्र लिहिले की कोव्हिड-19मुळं संशयित रुग्णांच्या लॅबच्या निकालाची वाट न पाहता कुटूंबाकडे सोपवावा, मात्र अंत्यसंस्कार हे सरकारने ठरवलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार होईल. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही एका ट्विटद्वारे लोकांना याबद्दल माहिती दिली. कोरोना संशियत रूग्णांचे मृतदेह कुटूंबाकडे देण्यासाठी रिपोर्टची वाट पाहू नये, अशी माहितीही गृह मंत्रालयाकडून ट्वीटद्वारे देण्यात आली आहे. तसेच मृतदेहाच्या अंत्यसंस्कारची पूर्ण खबरदारी घ्यावी असेही म्हटले आहे.
वाचा-गेल्या 24 तासांत कोरोनाचा देशात हाहाकार, असे आहेत आताचे अपडेट
In a letter issued by #DGHS to #Delhi Govt, guidelines on handing over of #dead bodies of suspect #COVID19 cases to relatives for #cremation have been relaxed to ensure that families do not need to wait until the result of lab report@LtGovDelhi @MoHFW_INDIA @PMOIndia @BJP4Delhi pic.twitter.com/douArbG7j6
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) June 14, 2020
वाचा-अखेर मुंबई लोकल सुरू झाली, रेल्वे मंत्र्यांनी केलं जाहीर
नवा हेल्पलाइन क्रमांक
या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक (9115444155) देखील जारी केला आहे. या क्रमांकावर कॉल करून, ओपीडी नेमणुका आणि वॉलंटियर्सशी बोलू शकता. याव्यतिरिक्त, दिल्ली एम्समध्ये आरोग्य मंत्रालयाने एक कॉल सेंटर देखील तयार केले आहे, जेणेकरुन इथले डॉक्टर देशभरातील इतर डॉक्टरांना उपचारासाठी सल्ला देऊ शकतील. हे केंद्र 24 सात 7 ही दिवस सुरू असेल. चालेल. त्यामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी खाण्यापिण्याची सोय केली जाईल.
24 तासांत 11502 रुग्णांची नोंद
देशात कोरोनाचा हाहाकार वाढत असताना कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत कोरोना रुग्णांची 3 लाख 32 हजार 424 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 11 हजार 502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद केली गेली. तर 325 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 69 हजार 798 इतकी आहे. तर देशात आतापर्यंत 9 हजार 520 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
वाचा-पुण्यात निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता, कन्टेन्मेंट झोन्सची होणार पाहणी
संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus in india