Home /News /videsh /

खुशखबर! 'या' देशाच्या लसीचं ट्रायल यशस्वी, 14 दिवसांत टळू शकतो मृत्यूचा धोका

खुशखबर! 'या' देशाच्या लसीचं ट्रायल यशस्वी, 14 दिवसांत टळू शकतो मृत्यूचा धोका

आरोग्य मंत्र्यानी दिलेल्या माहितीनुसार, 2021 जुलैपर्यंत उपलब्ध होणार असून सुरुवातीला ही लस डॉक्‍टर, नर्स, पॅरामेडिक्‍स सारख्या आरोग्य विभागारीत कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी सरकारनं राज्यांकडून यादी मागवली आहे.

आरोग्य मंत्र्यानी दिलेल्या माहितीनुसार, 2021 जुलैपर्यंत उपलब्ध होणार असून सुरुवातीला ही लस डॉक्‍टर, नर्स, पॅरामेडिक्‍स सारख्या आरोग्य विभागारीत कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी सरकारनं राज्यांकडून यादी मागवली आहे.

एकीकडे कोरोना रुग्णांची वाढ होत असताना अद्याप कोणत्याही देशाला कोरोनावर लस शोधता आलेली नाही आहे.

    बीजिंग, 15 जून : जगभरात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर असलेल्या चीनमध्ये संक्रमणाची दुसरी लाट (Second Wave of Covid-19) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, चीनमधील बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. या सगळ्यात चीनच्या सिनोवॅक बायोटेक लिमिटेड (Sinovac Biotech Ltd) या औषधी कंपनीनं एक चांगली बातमी दिली आहे. या कंपनी मार्फत तयार करण्यात आलेल्या लसीनं मानवी चाचण्यांचा टप्पा पार केला आहे. कंपनीने म्हटलं आहे की या लसीमुळे कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी शरीरातील प्रतिकार शक्ती वाढेल. या लसीला 'कोरोनावॅक' असं नाव देण्यात आलं आहे. या लसीच्या चाचणीत कोणतेही धोकादायक परिणाम दिसलेले नाहीत, असे कंपनीचं म्हणणं आहे. वाचा-धनंजय मुंडेंच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांचे आले रिपोर्ट, डॉक्टर म्हणाले... 90% लोकांची प्रतिकारशक्ती वाढली सिनोवॅक बायोटेकच्या प्रवक्त्याचं म्हणणं आहे की या लसीचे दोन डोस 14 दिवसांत चाचणीत सहभागी असलेल्यांना देण्यात आले होते, परंतु त्यांच्यावर कोणतेही दुष्परिणाम किंवा नकारात्मक प्रभाव दिसला नाही. याउलट या चाचणीत सहभागी झालेल्या 90 टक्के लोकांची प्रतिकारशक्ती वाढली आहे. ट्रायलमध्ये 743 निरोगी लोकांचा होता समावेश कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, कोरोनावॅकची चाचणी दोन टप्प्यात चीनमध्ये झाली. यात 18 ते 59 वर्षांच्या 743 निरोगी लोकांचा समावेश होता. यापैकी 143 लोक पहिल्या टप्प्यात आणि 600 लोक दुसर्‍या टप्प्यात सहभागी होते. त्या गटांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. या गटातही लस 28 दिवसांच्या अंतराने दिली गेली. वाचा-कोरोनाचा भयानक अवतार, बरा झालेला तरुण पुन्हा निघाला कोरोना पॉझिटिव्ह ब्राझीलसोबत कंपनीची भागीदारी सिनोवॅक बायोटेक कंपनीने ब्राझीलमध्ये तिसरा टप्प्याच्या चाचणीसाठी बुट्टान या संस्थेबरोबर भागीदारीची घोषणा केली. नवीन प्रकारच्या पॅथोजेनिक बॅक्टेरियामुळं ब्राझीलमध्ये जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत 77 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहेत. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग सारख्या उपायांनी अनेक देशांमध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे अशा लशीचा प्रभाव पाहण्यासाठी कोरोना संक्रमित देशांमध्ये चाचणी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाचा-आता कोरोना संशयित रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी असणार नवीन नियम संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona vaccine

    पुढील बातम्या