Home /News /news /

कोरोनाचा भयानक अवतार, बरा झालेला तरुण पुन्हा निघाला कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाचा भयानक अवतार, बरा झालेला तरुण पुन्हा निघाला कोरोना पॉझिटिव्ह

आरोग्य विभाग आणि वैद्यकीय कर्मचारीही यामुळे चिंतेत पडले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे.

    गिरिडीह (झारखंड ), 15 जून : देशात कोरोनाचा हाहाकार काही थांबण्याचं नाव घेत नाही. अशात कोरोनाचा एक अजब प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने कोरोनावर मात करत बरा झाला पण त्याला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभाग आणि वैद्यकीय कर्मचारीही यामुळे चिंतेत पडले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. तर आजूबाजूच्या परिसरातील लोक या घटनेने घाबरून गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गिरिडीहचं आहे. जिथे 21 मे रोजी एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला रांची इथल्या रिम्समध्ये दाखल करण्यात आलं. उपाचार घेतल्यानंतर तो बरा झाला आणि त्याला 2 जून रोजी घरी सोडण्यात आलं. तेव्हापासून तो होम क्वारंटाईनमध्ये होता. दरम्यान, त्याची तब्येत अचानक खालावली. त्यानंतर 10 जून रोजी त्याला पुन्हा रांची इथे उपचारासाठी दाखल केलं गेलं. तिने चाचणी केली असता त्याचा अहवाल पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आला. हा तरुण मुंबईत राहतो, 13 मे रोजीच परतला घरी हिंदुस्थानच्या म्हणण्यानुसार, हा तरुण मुंबईत रहायचा आणि 13 मे रोजी घरी परतला. आता हा तरुण पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याला गिरीडीहच्या कोव्हिड -19 रुग्णालयात दाखल केलं आहे. इथेच तो आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार घेत आहे. तसंच कुटुंबातील सर्व सदस्यांची चाचणी करून त्यांना क्वारंटाईमध्ये ठेवण्यात आलं आहे. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या