JOIN US
मराठी बातम्या / देश / ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, 16 जणांचा मृत्यू! हृदयद्रावक घटनेचा VIDEO आला समोर

ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, 16 जणांचा मृत्यू! हृदयद्रावक घटनेचा VIDEO आला समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

जाहिरात

पावसाने असा हाहा:कार माजवलाय की विविध ठिकाणच्या नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोनिया मिश्रा, प्रातिनिधी चमोली, 20 जुलै : भीषण उन्हाने त्रासलेले आपण पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो, पाऊस सुरू झाला तरी पुरेसा का पडत नाही, अशी चिंता व्यक्त करत होतो. मात्र आता पावसाने असा हाहा:कार माजवलाय की विविध ठिकाणच्या नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. पावसामुळे काल एकीकडे आपल्या राज्यात काही दुःखद घटना घडल्या. तर दुसरीकडे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यासाठीदेखील कालचा दिवस काळा ठरला. तिथे सकाळी ११.३५ वाजता मोठा अपघात घडला. अलकनंदा नदीच्या काठावर नमामि गंगा प्रकल्पातील सिव्हेज ट्रीटमेंट प्लांटच्या (सीटीपी) बांधकामाधीन जागेवर विजेचा धक्का लागून 16 जणांचा मृत्यू झाला, तर 11 जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एक एसआय, 3 होमगार्ड आणि दोन गावप्रमुखांचा समावेश आहे. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. https://youtu.be/S4jvXjFOqtE मिळालेल्या माहितीनुसार, या प्लांटचे पर्यवेक्षक गणेश लाल हे मंगळवारी रात्री एकटेच ड्युटीवर होते. त्यांचा फोन लागत नव्हता, शिवाय बुधवारी सकाळी ते घरी न आल्याने गावकऱ्यांनी शोध घेत त्यांचं कार्यालय गाठलं. तिथे गणेश यांचा मृतदेह जळालेल्या आणि चिकटलेल्या अवस्थेत आढळला. विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच चौकीचे इन्चार्ज प्रदीप रावत यांच्यासह तीन होमगार्ड मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी दाखल झाले. तर गावातून आणि परिसरातून 24 लोक आले होते. तेव्हा प्लँटमध्ये वीज नव्हती. मात्र पंचनामा सुरू असतानाच वीज आली आणि रेलिंगमध्ये विद्युत प्रवाह सुरू झाला. लोक अचानक जमिनीवर कोसळू लागले. जे बाहेर होते त्यांनी पळून आपला जीव वाचवला. मात्र यात 16 जणांनी जीव गमावला. Raigad Irshalwadi Landslide : निसर्गाची खाण अशी होती इर्शाळवाडी, 7 दिवसांपूर्वींचा VIDEO आला समोर जखमींपैकी 6 जणांना ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर 5 जणांवर गोपेश्वरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांनादेखील एम्समध्ये हलवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रुग्णालयात जाऊन सर्व जखमींची भेट घेतली, त्यांच्या नातेवाईकांना धीर दिला, डॉक्टरांशी चर्चा केली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना प्रत्येक एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेवर दुःख व्यक्त केलं. राष्ट्रीय मदत निधीतून पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी घटनेच्या दंडाधिकारीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या