JOIN US
मराठी बातम्या / देश / नवरी मुलीचा हट्ट, म्हणाली सासरी नव्हे तर आधी याठिकाणी जाणार... मग काय घडलं?

नवरी मुलीचा हट्ट, म्हणाली सासरी नव्हे तर आधी याठिकाणी जाणार... मग काय घडलं?

लग्नानंतर नवरी मुलीने असा हट्ट केला की, नवरा आणि वऱ्हाडींना तीन तास वाट पाहायला लावली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आगरा, 17 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात नवरी मुलीने घेतलेल्या एका निर्णयाची बातमी बातमी समोर आली आहे, जी जाणून तुम्हीही थक्क व्हाल. येथे लग्न झाल्यावर नवरी मुलगी सासरी न जाता थेट तिच्या शाळेत बारावी बोर्डाची परीक्षा द्यायला गेली. या दरम्यान वरमुलासह इतर वऱ्हाडी तब्बल तीन तास तिची वाट पाहत होते. नवरी आणि इतर सासरच्या मंडळींनी तिला निरोप देण्यासाठी सजवलेल्या गाडीतून परीक्षा केंद्रावर आणले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सकाळी घेतले सात फेरे - बरौली अहिरच्या सेमरी येथील रहिवासी असलेल्या आशा कुशवाह हिची 15 फेब्रुवारीला वरात आली होती. यानंतर काल सकाळी दोघांनी लग्नाचे सात फेरे घेतले. मात्र, लग्नाच्या दिवशीच तिची बारावीची परीक्षा होती. जर ती लग्नानंतर थेट सासरी गेली असती तर ती परीक्षेत नापास झाली असती. मात्र, विदाईची वेळ असताना तिने काहीही झाले तरी परीक्षा दिल्याशिवाय सासरच्या घरी जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. वधूच्या जिद्दीपुढे घरातील आणि तिच्या सासरच्या मंडळीनीही माघार घेतली. यानंतर आशा ही नवरीमुलगी आपला 12 वीचा पेपर देण्यासाठी बीआरआय इंटर कॉलेज, बिल्हैनी येथे आली. कपाळावर कुंकू, हातावर मेहंदी आणि बांगड्या घालून सजलेली ही नवविवाहित वधू गुरुवारी परीक्षा केंद्रावर आकर्षण ठरली होती. हेही वाचा -  लग्नाला झाले चार वर्ष, घरघुती वाद अन् पुण्यात पतीने केली पत्नीची हत्या, उचललं टोकाचं पाऊल

सासरी जाण्यापूर्वी तिने बोर्डाची परीक्षा दिली. नववधू आणि इतर सासरच्या मंडळींनी तिला निरोप देण्यासाठी सजवलेल्या गाडीतून परीक्षा केंद्रावर आणले. परीक्षा संपेपर्यंत वरासह इतर वऱ्हाडी तिची वाट पाहत राहिले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या