जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Pune Murder : लग्नाला झाले चार वर्ष, घरघुती वाद अन् पुण्यात पतीने केली पत्नीची हत्या, उचललं टोकाचं पाऊल

Pune Murder : लग्नाला झाले चार वर्ष, घरघुती वाद अन् पुण्यात पतीने केली पत्नीची हत्या, उचललं टोकाचं पाऊल

symbolic photo

symbolic photo

पती पत्नीच्या वादाचे रुपांतर भयानक घटनेत घडले.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 17 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून तसेच कौटुंबिक वादातून हत्या आणि आत्महत्येच्याही घटना घडत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती पत्नीच्या वादाचे रुपांतर भयानक घटनेत घडले. रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. यानंतर स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. काय आहे संपूर्ण प्रकरण - स्वाती जाधव (वय-22) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर अक्षय जाधव (वय-25) असे पतीचे नाव आहे. अक्षय आणि स्वाती यांचा विवाह हा चार वर्षांपूर्वी झाला होता. ते नगर जिल्ह्यातून येऊन पुण्यातील फुरसुंगी गावातील साई पॅराडाईज सोसायटीत ते राहत होते. गाड्या भाड्याने देण्याचा त्यांचा व्यवसाय होता. दोघांमध्ये बुधवारी वाद झाला. मात्र, या वादाचे रुपातंर भयानक घटनेत घडले. वादातून संतापात पती अक्षय याने पत्नी स्वातीची हत्या केली. अक्षय याने स्वातीचा गळा दाबून व डोके आपटून त्याने आपल्या पत्नीला संपवले. पत्नीची हत्या केल्यानंतर पती अक्षय याने स्वत: विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येच्या प्रयत्नामुळे त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच पत्नीच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा -  लिव्ह इन पार्टनरसोबत कांड, 3 घटना ज्यांनी देशाला हादरवलं! अशी आली घटना उजेडात - बुधवारी हा प्रकार झाल्यानंतर अक्षय अत्यवस्थ होता. त्यामुळे गुरुवारी सकाळी जाधव यांचे घर उघडले नाही. शेजाऱ्यांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. पोलिसांना घटनास्थळी येऊन दार तोडले. त्यानंतर घरात अक्षय अत्यवस्थ असल्याचा आढळून आला. तसेच स्वाती मृत झाली होती. सध्या अक्षय याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर याप्रकरणी स्वातीचे वडील विनायक मारुती थोरात (वय 39, रा. साईनगर, अहमदनगर) यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात अक्षय जाधव याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या स्वातीच्या खुनामागचे कारण अजून समोर आलेले नाही. अक्षयची प्रकृती बरी झाल्यावर त्याचा जबाब घेण्यात येणार आहे. त्यातून खुनाचे कारण समोर येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात