नवी दिल्ली, 25 डिसेंबर : दिल्ली भाजपच्या एका मुस्लीम महिला नेत्यानं पक्षाच्या कार्यपद्धतीवर मोठे आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रामलीला मैदानावर झालेल्या सभेत मुद्दाम व्यासपीठापासून दूर ठेवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हे प्रकरण बाहेर आलं एका व्हॉट्सअॅप चॅटमुळे. भाजपच्या अंतर्गत गोटातले नेते असणारा एका WhatsApp group आहे. या इंटर्नल व्हॉट्सअॅप ग्रूपवरचे मेसेज लीक झाल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं आहे. दिल्ली भाजपच्या नेत्या शाझिया इलमी यांनी आपल्याला मोदींच्या सभेत व्यासपीठावर मुद्दाम बसू दिलं नाही, असा आरोप केला आहे. रामलीला मैदानावर झालेल्या या सभेच्या वेळी ऑल अॅक्सेस पास केवळ भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनाच देण्यात आला. तो शाझिया इलमी यांना मिळाला नाही आणि त्यांना पत्रकारांसाठी असलेल्या कक्षात बसवण्यात आलं. वाचा - ‘मुस्लिमांना जाण्यासाठी 150 देश’, CAA वरून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शाझिया इलमी यांनी दिल्ली भाजपच्या कार्यकारिणीतल्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्याला मुद्दाम व्यासपीठापासून दूर ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे, पण आपण मुस्लीम असल्याचा त्याच्याशी संबंध नाही. या प्रकरणाकडे कृपया धार्मिक दृष्टिकोनातून पाहू नये, असंही शाझिया यांनी स्पष्ट केलं आहे. शाझिया इलमी या 2015 मध्ये आम आदमी पार्टीतून भाजपमध्ये आल्या होत्या. “हा विषय माध्यमांमध्ये पोहोचवण्याची इच्छा नव्हती. पण भाजपच्या अंतर्गत व्हॉट्सअॅप ग्रूपवरचा मेसेज कुणीतरी लीक केला आणि मला त्यावर बोलावं लागत आहे. याची केंद्रीय नेत्यांनी दखल घेतली आहे”, असंही शाझिया इलमी यांनी सांगितलं. ———————- अन्य बातम्या Axis Bankसंबंधातला फडणवीस सरकारचा निर्णय CM ठाकरे बदलणार राहुल गांधींचं म्हणणं ऐकून तिने UPSC चा नाद सोडला, 28 व्या वर्षी झाली आमदार ‘PM नरेंद्र मोदी खोटं बोलतात, माझ्याकडे पुरावे’, काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप फडणवीस-ठाकरे वाद पुन्हा चिघळला, अमृता फडणवीसांवर पुन्हा शिवसेनेचा हल्लाबोल