सागर कुलकर्णी, 25 डिसेंबर : ‘देशाचे पंतप्रधान हे विश्वासार्ह मानले जातात. पण आताचे पंतप्रधान खोटे बोलतात हे सिद्ध होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्थानबद्धता केंद्र (डिटेन्शन सेंटर) उभे करण्याविषयी कोणतीही चर्चा झाले नाही, असं सांगतात. पण केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात डिटेन्शन सेंटर उभे करण्याबाबत चर्चा झाली आहे, त्याबाबत पुरावे देखील आहेत,’ असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणीवपूर्वक खोटे बोलत आहेत. डिटेन्शन सेंटरबद्दल चर्चा झाली नाही, असं मोदींनी म्हटलं होतं. मात्र वास्तव वेगळं आहे. केंद्रीय गृहमंत्रलयाने जानेवारी 2019 मध्ये राज्यांना डिटेन्शन सेंटर उभे करण्याबाबत पत्रव्यवहार ड्राफ्ट पाठवला गेला. त्यानंतर राज्य गृहमंत्रालयने नवी मुंबईत सिडको व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र करून डिटेन्शन सेंटरसाठी जागा द्यावी ही मागणी केली,’ असा दावाही काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी केला आहे. ‘प्रत्येक राज्यात डिटेन्शन सेंटर उभे करण्याचा मानस केंद्र सरकारचा होता हे उघड होत आहे. यावरून पंतप्रधान जे सांगत होते की डिटेन्शन सेंटरबाबत चर्चा सुरू नाही, हे खोटं असल्याचं उघड झालं आहे, असे सचिन सावंत यांनी सांगितलं. डिटेन्शन सेंटर आणि वाद देशभरात सध्या नागरिकत्व सुधारणा कायदा (citizenship amendment act 2019) आणि National Register of Citizens कायद्यावरून वाद सुरू आहे. या कायद्याअंतर्गत जे लोक घुसखोर म्हणून सिद्ध होतील, अशा लोकांना ठेवण्यासाठी केंद्र सरकारने विविध राज्यांमध्ये स्थानबद्धता केंद्र उभारण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली इथल्या जाहीर सभेत हा आरोप फेटाळून लावला होता. मोदींना केला होता विरोधकांवर हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत झालेल्या प्रचारसभेत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. ‘हे विधेयक पारित झाल्यानंतर विरोधक जनतेला भ्रमित करत आहेत. खोटं बोलत आहेत. विरोधक नागरिकत्व कायद्याच्या नावाने लोकांना फसवत आहेत. नागरिकत्व कायद्याचा विरोध करणारे लोक हिंसाचार माजवत आहेत. देशात वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. मोदीचा पुतळा जाळा पण गरीबाची रिक्षा जाळू नका,’ असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.