राहुल गांधींचं म्हणणं ऐकून तिने UPSC चा नाद सोडला, 28 व्या वर्षी झाली आमदार

राहुल गांधींचं म्हणणं ऐकून तिने UPSC चा नाद सोडला, 28 व्या वर्षी झाली आमदार

कफन सत्याग्रह आंदोलनामुळे आई-वडिल तुरुंगात गेल्यानंतर अंबा प्रसादला लोकसेवा आयोगाचा(UPSC)अभ्यास अर्धवट सोडावा लागला.

  • Share this:

रांची, 25 डिसेंबर : हजारीबामधील बडकागाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची 28 वर्षीय उमेदवार अंबा प्रसाद विजयी झाली आहे. या विजयासह अंबा प्रसादने इतिहास घडवला आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेली अंबा प्रसाद ही एकमेव अशी उमेदवार आहे जी अविवाहित आहे. तसेच सर्वात कमी वयाची आमदारही ठरली आहे. अंबा प्रसाद हिने रोशनलाल चौधरी यांना 30 हजार 140 मतांनी पराभूत केलं.

बडकागांव विधानसभा मतदारसंघातून याआधी अंबा प्रसाद यांचे वडील योगेंद्र साहूंनी 2009 मध्ये तर आई निर्मला देवी यांनी 2014 मध्ये विजय मिळवला होता. मात्र कफन सत्याग्रह आंदोलनामुळे आई-वडिलांना तुरुंगात जावं लागलं आणि अंबा प्रसादला लोकसेवा आयोगाचा(UPSC)अभ्यास अर्धवट सोडावा लागला. घरी परतल्यानंतर अंबा प्रसादने हजारीबाग न्यायालयात वकिली सुरू केली. आई-वडील आणि भावावर असलेला खटल्यातही स्वत: लक्ष घातलं.

आमदार होण्याचा विचारही केला नव्हता

अंबा प्रसादचे वडील योगेंद्र साहू, आई निर्मला देवी आणि भावावर सध्या कफन सत्याग्रह प्रकरणी खटला सुरू आहे. तिचे वडील तुरुंगात तर आई राज्याबाहेऱ आहे. तर बऱ्याच प्रयत्नानंतर भावाला तुरुंगातून सोडवलं आहे. अंबा प्रसाद निवडणूक जिंकल्यानंतर म्हटलं की, मी कधी विचारही केला नव्हता की आमदार होईन. पण आई-वडील तुरुंगात गेल्यानंतर शपथ घेतली होती की बडकागाव विधानसभा मतदारसंघात त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करेन.

माझ्या संपूर्ण कुटुंबाला कफन सत्याग्रह आंदोलनात गोवण्यात आल्याचा आरोप अंबा प्रसादने केला. मी 2014 मध्ये बीआयटीमधून बीबीए केलं होतं. त्यानंतर विनोबा भावे विद्यापीठातून वकिलीची पदवी घेतली. माझ्या वडिलांवर राजकीय आरोप केले असून त्यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा कट रचला गेला. कुटुंबावर आलेल्या या संकटामुळे मी आयएएसची तयारीसुद्धा नीट करू शकत नव्हते. मी पुन्हा इथं येऊन वकिली सुरू केली. बडकागाव इथं पाणी, जंगल आणि जमीनीसाठी संघर्ष सुरू असल्याचं अंबा प्रसादने सांगितलं.

राहुल गांधींना भेटल्यानंतर राजकारणात सक्रीय

अंबा प्रसाद म्हणाली की, वडिलांच्या सुटकेबाबत मी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद यांनाही भेटले. अहमद पटेल यांनी या कामात माझी खूप मदत केली. राहुल गांधींनी माझ्या वडिलांबद्दलची माहिती जाणून घेतल्यानंतर मला मदत केली. तसेच यापुढे काम करत राहण्यास सांगितलं. मला काँग्रेस आणि नेत्यांचा पाठिंबा मिळाला. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची चर्चा होती पण विधानसभेसाठी मला संधी दिली.

मंत्रीपद मिळण्याची शक्यता

झारखंडमध्ये आता काँग्रेसच्या हातात सत्ता आहे. जर यामध्ये मंत्रीपदाची संधी मिळाली तर काम करायला आवडेल असंही अंबा प्रसादने म्हटलं आहे. गेल्या चार वर्षांपासून मी या भागात काम करत आहे असंही अंबा प्रसादने म्हटलं. हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये शिक्षण मंत्री अंबा प्रसादला दिलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

'PM नरेंद्र मोदी खोटं बोलतात, माझ्याकडे पुरावे', काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jharkhand
First Published: Dec 25, 2019 11:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading