JOIN US
मराठी बातम्या / देश / Cyclone Biparjoy : सौराष्ट्र, कच्छमध्ये रेड अलर्ट; मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा, हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

Cyclone Biparjoy : सौराष्ट्र, कच्छमध्ये रेड अलर्ट; मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा, हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

बिपरजॉय चक्रीवादळ उद्या गुजरातच्या कच्छ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सौराष्ट्र आणि कच्छमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जाहिरात

कच्छमध्ये रेड अलर्ट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जून : बिपरजॉय चक्रीवादळ उद्या गुजरातच्या कच्छ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या गावातील तीस हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. बिपरजॉय चक्रीवाळ 15 जूनला दुपारच्या सुमारास सौराष्ट्र , कच्छच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कच्छ आणि सौराष्ट्र जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडून देखील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ उद्या 15 जूनला कच्छच्या समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते पाकिस्तानकडे सरकरणार आहे. जसं जसं हे चक्रिवादळ उत्तर-पश्चिमेकडे जाईल तसं तसं ते आणखी रौद्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. सध्या बिपरजॉय चक्रीवादळ हे कराची पासून 380 किलोमीटर अतंरावर आहे.

Monsoon Update : मान्सूनबाबत ‘स्कायमेट’कडून महत्त्वाची अपडेट; भाकीत खरे ठरल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार

संबंधित बातम्या

रेल्वे गाड्या रद्द बीपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातकडे जाणाऱ्या आणि गुजरातमधून येणाऱ्या 95 रेल्वे गाड्या 15 जूनपर्यंत पश्चिम रेल्वेकडून रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान या काळात गुजरातला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवर 150 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्र किनारी 10 ते 14 मीटर उंच लाटा उसळतील तर 25 सेंटीमीटरहून अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बिपरजॉयमुळे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून कच्छ, द्वारका आणि जामनगर जिल्ह्याला याचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या