जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Monsoon Update : मान्सूनबाबत 'स्कायमेट'कडून महत्त्वाची अपडेट; भाकीत खरे ठरल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार

Monsoon Update : मान्सूनबाबत 'स्कायमेट'कडून महत्त्वाची अपडेट; भाकीत खरे ठरल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार

मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट

मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट

स्कायमेटकडून मान्सूनबाबत नवा अंदाज वर्तवण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 जून : स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं मान्सून बाबत महत्त्वाची आपडेट दिली आहे. येत्या चार आठवड्यात देशात पावसाचं प्रमाण कमी राहील असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. पाऊस वेळेवर व पुरेसा न पडल्यास पेरणीला उशिर होऊ शकतो. पुढील चार आठवडे म्हणजेच 6 जुलैपर्यंत देशभरात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असा अंदाज स्काटमेट कडून वर्तवण्यात आला आहे. बिपरजॉयचा अडथळा यंदा मान्सून उशिरानं केरळमध्ये दाखल झाला. मान्सूनला केरळमध्ये पोहोचण्यासाठी यावर्षी एक आठवडा उशिर झाला आहे. त्यातच आता बिपरजॉय चक्रिवादळामुळे मान्सूनची गती मंदावली आहे. महाराष्ट्रात रविवारी तळ कोकणात मान्सून दाखल झाला. मात्र बिपरजॉय वादळामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. बिपरजॉय चक्रिवादळामुळे मान्सूनची गती मंदावली असून, जसा जसा चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल तसा-तसा मान्सून राज्यभरात सक्रीय होईल असं भारतीय हवामान खात्यानं मंगळवारी म्हटलं होतं.

बिपरजॉयचा धोका वाढला, मोठ्या नुकसानीची शक्यता, मान्सूनवर होणार परिणाम?

गुजरातला बिपरजॉयचा फटका दरम्यान दुसरीकडे अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवर 150 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्र किनारी 10 ते 14 मीटर उंच लाटा उसळतील तर 25 सेंटीमीटरहून अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बिपरजॉयमुळे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून कच्छ, द्वारका आणि जामनगर जिल्ह्याला याचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात