JOIN US
मराठी बातम्या / देश / Vehicle Care Tips : पावसाळ्यात परत-परत बंद पडते दुचाकी, आता ही गोष्ट करा होईल फायदा

Vehicle Care Tips : पावसाळ्यात परत-परत बंद पडते दुचाकी, आता ही गोष्ट करा होईल फायदा

पावसाळ्यात इलेक्ट्रीकल वाहनाची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असते.

जाहिरात

अशी घ्या वाहनाची काळजी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रवि पायक, प्रतिनिधी भीलवाडा, 13 जुलै : सध्या पावसाळा सुरू झाला आहे. मान्सूनचा कालावधी सुरू झाला की, शहरातील अनेक ठिकठिकाणी पाणी जमा होते. त्यामुळे अनेकदा दुचाकी चालकांना समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये दुचाकी अनेकवेळा बंद होते, ही समस्या सर्वात जास्त येते. इतकेच नाही तर पावसात अनेकदा या दुचाकी बाहेर उभ्या असतात, यामुळे पावसाच्या पाण्यामुळे त्यांच्यात बिघाड होतो. म्हणून अशा परिस्थितीत पावसाच्या दिवसात वाहनांची विशेषत: दुचाकींची एक्स्ट्रा काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचे वाहनात कधीच बिघाड होणार नाही. भीलवाडा येथील दुचाकी मेकॅनिक कैलाश चंद्र यांनी सांगितले की, पावसाळ्यात इलेक्ट्रीकल वाहनाची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या वाहतुकीला ओरिजीनल चार्जरने चार्जिंग करायला हवी. हे चार्जर प्रोटेक्टिव्ह लेअरच्या सोबत येते. ते कोणत्याही प्रकारचा शॉट सर्किट, स्पार्क आणि करंट लॉस होऊ देत नाही. पावसामुळे बॅटरीच्या कनेक्शनच्या जागी जंग लागण्याचा धोका असतो.

पावसाळ्यात वाहनचालकाने पाण्याच्या ठिकाणाहून आपली दुचाकीला हळूहळू काढावे. सोबतच जंग लागू नये म्हणून वेळोवेळी तपासणी करावी. सोबतच ते म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन, स्कूटी किंवा दुचाकीवर पाणी पडणार नाही अशा ठिकाणी उभे करावे. तसेच पावसाळ्यात ओली जागेवर नव्हे तर सुक्या जागेवरच चार्ज करावे. पावसामुळे विद्युत प्रवाह येण्याची शक्यता असते. दुचाकीचे मेकॅनिक कैलाश चंद्र यांनी सांगितले की, पावसाळ्यात मेकॅनिकमध्ये एक्स्ट्रा काम असतो. काही वेळा लोक पावसाळ्याच्या आधीच दुचाकीची सर्व्हिसिंग करण्याचा प्रयत्न करतात. सर्व्हिसिंग नंतर आपली दुचाकीची वेळोवेळी तपासणी करावी. तसेच प्लगही वेळोवेळी साफ करत राहावा. अनेक वेळा सायलेंसरमध्ये पाणी भरुन जाते. त्यामुळे दुचाकी बंद होते म्हणून याप्रकारे काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या