JOIN US
मराठी बातम्या / देश / माणुसकी हरवली! कोरोना संशयित म्हणून घरच्यांनी काढलं घराबाहेर, तापानं फणफणत रस्त्यावर होता भटकत अखेर...

माणुसकी हरवली! कोरोना संशयित म्हणून घरच्यांनी काढलं घराबाहेर, तापानं फणफणत रस्त्यावर होता भटकत अखेर...

या अदृश्य रोगाशी सामना करण्यासाठी सर्वांना एकत्र राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र अशा परिस्थितीतही माणुसकी हरवल्याच्या घटना समोर येत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 11 जून : देशात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना या अदृश्य रोगाशी सामना करण्यासाठी सर्वांना एकत्र राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र अशा परिस्थितीतही माणुसकी हरवल्याचा घटना समोर येत आहेत. भोपालमध्ये राहणाऱ्या एका 49 वर्षीय अविवाहित व्यक्तीला कोरोना संशयित असल्यामुळं घराबाहेर काढलं. इकडे-तिकडे भटकल्यानंतर संध्याकाळी हबीबगंज स्टेशन गाठलं आणि आग्राचे तिकिट घेतले. जेव्हा या व्यक्तीला पोलिसांनी पाहिलं तेव्हा त्यांची तपासणी करण्यात आली, तेव्हा ही व्यक्ती तापानं कापत होती. चौकशी दरम्यान या व्यक्तीनं आपलं नाव ओमकार असल्याचं सांगितलं. त्याने सांगितले की एक दिवसआधीच त्याची चाचणी करण्यात आली आहे. मात्र त्याच रिपोर्ट येण्याआधीच तो भोपाळ सोडून जाण्याची तयारी करत होता. ओमकारनने सांगितले की त्याला बऱ्याच दिवसांपासून खोकला आणि ताप होता. जेव्हा मंगळवारी त्याची चाचणी करण्यात आली तेव्हा त्याला घरच्यांनी कोरोना संशियत समजून घराबाहेर काढलं. वाचा- O रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात कमी धोका, तज्ज्ञांचा दावा हबीबगंज स्थानकात उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकात सामील झालेल्या डॉ. अमित मुखर्जी आणि डॉ. नवनीत आर्य यांनी ओमकारला नमुना घेतल्याचा पुरावा मागितला असता त्यानं मोबाईलवरील मेसेज दाखवला. या पथकाने स्टेशनवर कार्यरत स्वयंसेवकांच्या मदतीने ओमकारला स्टेशपासून दूर असलेल्या एका बाकावर बसवले आणि कंट्रोल रूममधील नोडल अधिकारी डॉ. उपेंद्र धोटे यांच्याशी चर्चा केली. सुमारे दीड तासानंतर रुग्णवाहिका स्टेशनवर आली आणि त्याला रुग्णालयात घेऊन गेली. वाचा- देशात मृतांचा आकडा 8 हजार पार, तरी एक आनंददायी बातमी वाचा- पत्नीला कोरोना झाल्याच्या धास्तीने पतीने केली आत्महत्या संकलन, संपादन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या