COVID-19: देशात मृतांचा आकडा 8 हजार पार, तरी एक आनंददायी बातमी

COVID-19: देशात मृतांचा आकडा 8 हजार पार, तरी एक आनंददायी बातमी

भारतातील एकूण मृतांचा आकडा 8 हजारांच्यावर गेला आहे. ही चिंतेची बाब असली तरी एक दिलासादायक बातमीही आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जून : देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 9996 नवीन रुग्ण आढळून आले. यासह कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 86 हजार 579 झाला आहे. तर, दुसरीकडे आत मृतांचा आकड्यात सर्वात जास्त वाढ झाली. गेल्या 24 तासांत तब्बल 357 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण मृतांचा आकडा 8 हजारांच्यावर गेला आहे. ही चिंतेची बाब असली तरी एक दिलासादायक बातमीही आली आहे.

भारतात आज सगळ्यात जास्त म्हणजे 357 रुग्णांचा मृत्यू झाला. याआधी 6 जून रोजी सगळ्यात जास्त 298 लोकांचा मृत्यू झाला होता. यासह भारतातील मृतांचा आकडा 8 हजार 102 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून रोज 9000 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र असे असले तरी निरोगी रुग्णांची संख्या देशात वाढत आहे.

वाचा-सलग 7व्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या घरात, चिंता वाढली

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाचे आता 1 लाख 37 हजार 448 अॅक्टिव्ह प्रकरणं आहेत. तर, 8 हजार 102 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आनंदाची बाब म्हणजे आतापर्यंत 1 लाख 41 हजार 28 लोकं निरोगीही झाले आहे. सलग दुसऱ्यांदा अॅक्टिव्ह केसेस पेक्षा निरोगी रुग्णांची संख्या जास्त आहे. भारताचा रिकव्हरी रेट 49.2% झाला आहे. याआधी बुधवारीही निरोगी रुग्णांची संख्या जास्त होती. गेल्या 24 तासांत जवळजवळ 5 हजारहून अधिक रुग्ण निरोगीही झाले आहे. भारताचा मृत्यूदर सध्या 2.83% आहे.

वाचा-क्वारंटाइन सेंटरमध्ये रंगला सामना, माजी मुख्यमंत्र्यांनी शेअर केला VIDEO

भारतातील आसाम, जम्मू काश्मीर, कर्नाटक, नागालॅंड, ओडिशा, पुदुच्चेरी, त्रिपुरा आणि उत्तराखंड या 8 राज्यांमध्ये निरोगी रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. तर, महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, गुजरात आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये गेल्या 24 तासांत 5 हजारहून अधिक रुग्ण सापडले आहेत.

वाचा-खरं आहे की खोटं: 15 जूननंतर देशभरात पुन्हा लागू होणार कडक लॉकडाऊन?

इतर देशांच्या तुलनेत भारत अजूनही सहाव्या क्रमांकावर आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, ब्रिटन, स्पेन यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. मात्र भारताचा मृत्यूदर रशिया वगळता इतर सर्व देशांपेक्षा कमी आहे. रशियाचा मृत्यूदर 1.29% आहे.

वाचा-कोरोनामुळे तरुणांसमोर मोठं संकट, पिंपरी चिंचवडसह इतर भागातही अनेकांच्या नोकऱ्या

संपादन, संकलन-प्रियांका गावडे.

First published: June 11, 2020, 11:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading