Home /News /national /

O रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात कमी धोका, तज्ज्ञांचा दावा

O रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात कमी धोका, तज्ज्ञांचा दावा

कोरोना सारख्या महाभयंकर साथीसबोत लढण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’ हा उपाय नाही असं मतही सरीन यांनी व्यक्त केलं. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.

कोरोना सारख्या महाभयंकर साथीसबोत लढण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’ हा उपाय नाही असं मतही सरीन यांनी व्यक्त केलं. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.

तज्ज्ञांनी केलेल्या एका अभ्यासातून आणखी एक दिलासादायक बाब समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 11 जून : जगभरात कोरोना व्हायरसमुळे लोकांची मनात दहशत निर्माण झाली आहे. अद्याप कोरोनावर कोणतंही ठोस लस न मिळाल्यानं युद्धपातळीवर शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ त्यावर काम करत आहेत. तज्ज्ञांनी केलेल्या एका अभ्यासातून आणखी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. O रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे. कोरोनाचे विषाणू प्रत्येक रक्तगटात वेगवेगळे दिसून येत आहेत त्यामध्ये O रक्तगट असणाऱ्यांना धोका कमी असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. संशोधनातून कोणती नवीन गोष्ट समोर आली 75 हजार लोकांवर केलेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. या संशोधनात इतर कोरोनाच्या रुग्णांच्या तुलनेत O रक्तगट असलेल्या लोकांना 13 ते 26 टक्के कोरोनाचं संक्रमण होण्याचा धोका कमी असतो असा दावा करण्यात आला आहे. हे वाचा-सलग 7व्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या घरात, चिंता वाढली O रक्तगट असणाऱ्या लोकांच्या तुलनेत इतर ब्लडग्रूप असलेल्या लोकांमध्ये संशोधकांना कोणताही महत्त्वपूर्ण फरक दिसला नाही. पण O रक्तगट असणाऱ्या लोकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचं प्रमाण कमी असल्याचं आढळून आलं. न्यूज वीकने दिलेल्या वृत्तानुसार या अभ्यासाचा आढावा अजून घेण्यात आला नाही. हा दावा अद्याप वैज्ञानिक जर्नलमध्येही प्रकाशित कऱण्यात आला नाही. ही माहिती लोकांना विचारलेले प्रश्न आणि डेटा कलेक्शनवर सध्या आधारीत असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये O रक्तगटामधील लोकांची रुग्णालयातील संख्या कमी असल्याचंही लक्षात आलं. हे संशोधन करताना दोन विभागांमध्ये करण्यात आलं आहे. कोरोना झालेले रुग्ण आणि कोरोना न झालेल्या लोकांवर हा रिसर्च करण्यात आला होता. त्यानुसार हा डेटा गोळा करून त्यावर अभ्यास करून तज्ज्ञांनी हा दावा केला आहे. हे वाचा-पत्नीला कोरोना झाल्याच्या धास्तीने पतीने केली आत्महत्या हे वाचा-कोरोनामुळे तरुणांसमोर मोठं संकट, पिंपरी चिंचवडसह इतर भागातही अनेकांच्या नोकऱ्या संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या