भोपाळ, 08 जुलै : मध्ये प्रदेशातील भोपाळ इथं एक किळसवाणा प्रकार घडला. एका 55 वर्षीय इसमानं गाईसोबत अतिप्रसंग केला. याविरुद्ध त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपीविरुद्ध कलम 377 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 4 जुलै रोजी घडल्याचे सांगितले जात आहे. हे सगळं कृत्य गोठ्यात असलेल्या CCTVमध्ये कैद झालं. CCTV व्हिडीओ पाहिल्यानंतर डेअरी मालकानं मंगळवारी पोलीस स्थानकात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनेच्या काही दिवस आधी आणि नंतरचे फुटेज पोलीस अधिकारी सध्या तपासात आहेत. भोपाळचे पोलीस स्टेशनचे प्रभारी आलोक श्रीवास्तव यांनी सांगितले की, 7 जुलै रोजी पोलीस स्टेशन परिसरातील दुग्धशाळेतील संचालक राम यादव यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीत असे सांगितले गेले होते की, या 55 वर्षीय व्यक्तीनं आपल्या गायीशी अनैसर्गिकरित्या अतिप्रसंग करत होता. तक्रारदारानं पोलिसांना घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही दिले. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशीही केली जात आहे. वाचा- लेकराच्या जन्मासाठी माऊलीचा 28 किमी पायपीट, काळीज पिळवटून टाकणारी घटना चोरी करण्यासाठी घुसला होता इसम आलोक श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम यादव यांनी सांगितले की आरोपी 4 जुलै रोजी पहाटे 4 वाजता त्याच्या दुग्धशाळेमध्ये घुसला आणि गायीसह अनैतिक कृत्य करू लागला. यासगळ्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर राम यादव यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. श्रीवास्तव म्हणाले की, हा प्रकार घडण्याची पहिली घटना आहे, त्यामध्ये गाईशी लैंगिक संबंध ठेवल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात अद्याप चौकशी सुरू आहे. फुटेजचीही तपासणी केली जात आहे. वाचा- चिमुरड्याच्या अंगावरून गेली कार आणि…श्वास रोखून धरायला लावणार VIDEO वाचा- आणखी एका Tiktok स्टारची आत्महत्या, चाहत्यांना बसला धक्का