आणखी एका Tiktok स्टारची आत्महत्या, चाहत्यांना बसला धक्का

आणखी एका Tiktok स्टारची आत्महत्या, चाहत्यांना बसला धक्का

  • Share this:

नवी दिल्ली 7 जुलै: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येच्या घटनेने त्याचे चाहते अजुनही त्या धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत. त्यानंतर देशात Tiktok स्टारच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत. मंगळवारी आणखी एका Tiktok स्टारने आत्महत्या केली आहे. संध्या चौहान (Sandhya Chauhan)  असं या Tiktok स्टारचं नावं होतं. ती 18 वर्षांची होती. तिच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही.

संध्या ही दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेत होती. तिच्या जवळून सुसाइड नोट मिळालेली नाही. त्यामुळे आत्महत्येचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. तिच्या चुलत बहीण तिच्या खोलीत गेल्यानंतर तिला संध्या मृतावस्थेत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर तिनेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. गेल्या 2-3 महिन्यांपासून ती नैराश्यात होती अशी माहिती तिच्या ओळखीच्या लोकांकडून पोलिसांना देण्यात आली आहे. त्याच नैराश्यातून तर तिने हे टोकाचं पाऊल उचललं का याचा पोलीस तपास करत आहे.

पोलिसांनी संध्याचा फोन जप्त केला असून त्याचे कॉल डिटेल्स आता तपासण्यात येणार असून तिच्या मित्रांचीही चौकशी करण्यात येणार आहे. नुकतीच सिया कक्कड (Siya Kakkar) या Tiktok स्टारनेही आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती.

सरकारने नुकतीच चीनच्या 59 Appsवर बंदी घातली होती.

 

Published by: Ajay Kautikwar
First published: July 8, 2020, 12:00 AM IST
Tags:

ताज्या बातम्या