साओ पाउलो, 08 जुलै : एखाद्या मोठ्या व्यक्तीला गाडीने धडक दिल्यानंतर ती व्यक्ती गाडीच्या खाली आल्यावर तिची काय अवस्था होईल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मग अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्याच्या अंगावरून कार गेली, मग काय झालं असावं? असाच हा श्वास रोखून धरायला लावणारा व्हिडीओ समोर आला आहे.
हा व्हिडीओ ब्राझीलमधील आहे. अवघ्या दोन वर्षांच्या मुलाला कारची धडक बसते, तो त्या कारच्या खाली जातो आणि कारची दोन्ही चाकं त्याच्या वरून जातात. 24 जूनला अरगुअरीमध्ये घडलेली ही घटना आहे, ज्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
थिओ असं या मुलाचं नाव असल्याचं सांगितलं जातं आहे. व्हिडीओत आपण पाहू शकतो एक व्यक्ती थिओला रस्त्यापलीकडे उभ्या असलेल्या कारजवळ नेऊन सोडते. ही थिओची आजी आहे. या कारच्या दरवाजाजवळ थिओची आई आहे, आजीने आईकडे सोडल्यानंतर काही वेळातच थिओ तिथून पुन्हा धावू लागतो आणि रस्ता ओलांडायला जातो. त्याची आईदेखील त्याच्या मागून त्याला पकडायला धावते. मात्र इतक्यात अचानक एक कार येते आणि थिओला धडकते.
हे वाचा - पाहता पाहता नदीत बुडाली माणसांनी भरलेली बोट, थरकाप उडवणारा VIDEO
घटना इतक्या वेगाने घडते की कारचालकाला आपली कारला ब्रेकही मारायला मिळत नाही आणि थिओची आई किंवा तिथं असलेले इतर लोकही काहीच करू शकत नाही. गाडी थिओच्या अंगावरूनच जाते. कारची दोन्ही चाकं त्याच्या अंगावरून जातात. कार गेल्यानंतर त्याची घाबरलेली आई त्याला उचलते आणि फूटपाथवर घेऊन जाते. त्यानंतर इतर लोकही तिच्या मदतीला येतात.
हे वाचा - भर पावसात सुरू होते पोल दुरुस्तीचे काम,वायरमॅनचा अचानक गेला तोल आणि..,पाहा VIDEO
हे सर्व वाचल्यानंतर त्या मुलाचं काय झालं असावं तो विचार आपल्या मनात आलाच असेल. मात्र तुम्हाला वाचून धक्का बसेल या मुलालाही काहीही झालेलं नाही. सुदैवानं तो जिवंत आहे. त्याचं एकही हाडदेखील तुटलेलं नाही. थिओला गंभीर दुखापत झालेली नाही. त्याला किरकोळ जखमा झाल्यात. मानेवर मार बसला आहे आणि एक दात तुटला आहे. घटनेनंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. जिथं त्याला आपात्कालीन विभागात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर त्याला एका दिवसातच डिस्चार्ज देण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.