JOIN US
मराठी बातम्या / देश / 100 हून अधिक पुरुषांनी माझ्या पत्नीला मारलं आणि...; सैन्यातील जवानाची सोशल मीडियावर तक्रार

100 हून अधिक पुरुषांनी माझ्या पत्नीला मारलं आणि...; सैन्यातील जवानाची सोशल मीडियावर तक्रार

संरक्षण दलामध्ये भरती होऊन देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना समाजामध्ये कायम आदर मिळतो. तमिळनाडूमधील एका लष्करी कर्मचाऱ्याबाबत मात्र एकदम उलट घडल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात

आर्मी जवान

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 जून :  संरक्षण दलामध्ये भरती होऊन देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना समाजामध्ये कायम आदर मिळतो. तमिळनाडूमधील एका लष्करी कर्मचाऱ्याबाबत मात्र एकदम उलट घडल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये लष्करातील एका जवानानं दावा केला आहे की, तमिळनाडूमध्ये 100 हून अधिक पुरुषांनी त्याच्या पत्नीला अर्धनग्न करून अमानुषपणे मारहाण केली. प्रभाकरन असं या जवानाचं नाव असून, ते भारतीय सैन्यात हवालदारपदावर कार्यरत आहेत. हा व्हिडिओ निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल एन. थियागराजन यांनी शेअर केला होता. त्यात हवालदार प्रभाकरन तक्रार करताना दिसत आहेत. प्रभाकरन तमिळनाडूमधील पडवेडू गावचे रहिवासी असून, सध्या ते काश्मीरमध्ये तैनात आहेत. Dowry : पोलीस हवालदाराचा आदर्श; फक्त एक रुपया आणि नारळ घेऊन वधूला.. सगळीकडून कौतुकाचा वर्षाव तमिळनाडूमधील तिरुवन्नमलाई जिल्ह्यात दुकान चालवणाऱ्या आपल्या पत्नीला 120 पुरुषांनी अर्धनग्न करून अमानुषपणे मारहाण केली. तिच्या दुकानाची तोडफोड केली, असा आरोप प्रभाकरन यांनी व्हिडिओमध्ये केला आहे. प्रभाकरन यांनी पुढे माहिती दिली की, त्यांनी या प्रकरणाची एसपींकडे तक्रार केली असून, त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

संबंधित बातम्या

तमिळमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये प्रभाकरन म्हणतात, “माझ्या पत्नीवर 120 पुरुषांनी हल्ला केला आणि तिच्या दुकानातील वस्तू फेकून दिल्या. याबाबत मी एसपींना निवेदन पाठवलं असून, त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आहे. डीजीपी साहेब, कृपया मला मदत करा. आरोपींनी माझ्या कुटुंबावर चाकूनं हल्ला करून धमकावलं आहे. माझ्या पत्नीला अर्धनग्न करून बेदम मारहाण करण्यात आली आहे.” दरम्यान, या घटनेचा प्राथमिक तपास करणार्‍या कंधवसल पोलिसांनी एक निवेदन जारी करून ही घटना अतिशयोक्तीपूर्ण असल्याचा दावा केला आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भाडे तत्त्वावर असलेल्या जमिनीच्या वादातून जवानाची पत्नी आणि काही पुरुषांमध्ये भांडण झालं. ही महिला रेणुगंबल मंदिराच्या जागेवर भाडेतत्त्वानुसार दुकान चालवते. एक फेसबुक पोस्ट आणि लाखोंची मदत! गरीब मुलीचं आयुष्य पालटलं पोलिसांनी माध्यमांना सांगितलं की, पैशांच्या बदल्यात जमीन परत करण्याचा करार फेब्रुवारीमध्ये झाला होता. पण, जवानाची पत्नी आणि तिच्या आईनं ही जमीन रिकामी करण्यास नकार दिला. त्यानंतर वाद निर्माण झाला. पोलिसांनी असंही सांगितलं की, महिलांवर शारीरिक हल्ला झालेला नाही. दुसरीकडे भाजपाचे तमिळनाडू प्रदेश प्रमुख के. अन्नामलाई यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. आपण पीडित हवालदाराशी बोलल्याचं त्यांनी सांगितलं. “काश्मीरमध्ये आपल्या देशाची धैर्यानं सेवा करणाऱ्या हवालदाराशी आणि तिरुवन्नमलाई येथील त्याच्या पत्नीशी दूरध्वनीवरून संभाषण झालं. त्यांच्याबाबत घडलेला प्रकार ऐकून मी खरच हताश झालो. मला लाज वाटली की, आपल्या तमिळभूमीत एका स्त्रीसोबत असं गैरवर्तन घडलं आहे! आमच्या पक्षाचे लोक आता या स्त्रीला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिला सध्या वेल्लोरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,” असं ट्विट के. अन्नामलाई यांनी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या