जाहिरात
मराठी बातम्या / देश / Dowry : पोलीस हवालदाराचा आदर्श; फक्त एक रुपया आणि नारळ घेऊन वधूला.. सगळीकडून कौतुकाचा वर्षाव

Dowry : पोलीस हवालदाराचा आदर्श; फक्त एक रुपया आणि नारळ घेऊन वधूला.. सगळीकडून कौतुकाचा वर्षाव

फक्त एक रुपया आणि नारळ घेऊन वधूला

फक्त एक रुपया आणि नारळ घेऊन वधूला

Dowry : वर मुकेश मीना यांनी सांगितले की, लग्नापूर्वी त्यांनी वधू पक्षाच्या सर्व कुटुंबीयांना हुंडा देऊ नका असे सांगितले होते.

  • -MIN READ Rajasthan
  • Last Updated :

कोटा, 11 जून : लग्न म्हटलं की थाटमाट आणि नवरदेवाला दिलेल्या मोठ्या हुंड्याची चर्चा सगळीकडे असते. अलीकडच्या काळात थेट पैशात हुंडा घेतला जात नसला तरी गाडी, बंगला, दागिने या माध्यमातून मुलीच्या आईवडिलांकडून भरपूर पैसा उकळला जातो. पण, अशातही काही विवाह वेगळे ठरतात. कोटा शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलतानपूर गावात आलेल्या लग्नाच्या मिरवणुकीची सर्वत्र चर्चा होत आहे. नवरवेद एक पोलीस आहे. मात्र, वर मुकेश मीणा याने आपल्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सासरच्यांकडून हुंडा न घेऊन समाजासमोर आदर्श ठेवला आहे. हुंडा न घेता लग्न करून सासरच्या मंडळींकडून फक्त एक रुपया आणि नारळ घेऊन वधूला घरी घेऊन आले आहेत. वराच्या या निर्णयाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. जैतपूर गावातील रहिवासी मुकेश मीना (पोलीस कॉन्स्टेबल) आणि वधू सुमन कुमारी यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यात वरीकडील मुकेश मीना (वर), वराचा मोठा भाऊ नरेश मीना आणि त्याचे वडील साबू लाल यांनी कोणत्याही प्रकारची रोख रक्कम किंवा हुंडयाचे साहित्य न घेण्याचा निर्णय घेतला. वाचा - तक्रार द्यायला पोलिसांत गेलेली महिला पतीसमोर आरोपीसोबतच फरार; पोलीसही शॉक हुंडा प्रथेच्या विरोधात त्याचबरोबर हुंडा प्रथा, भ्रूणहत्या, नशा यांसारख्या वाईट गोष्टींना त्यांनी विरोध केला. लग्नाचे शगुन म्हणून फक्त एक रुपया आणि एक नारळ घेऊन विवाह संपन्न झाला. वर मुकेश मीना यांनी सांगितले की, लग्नापूर्वीच त्यांनी वधू पक्षाच्या सर्व कुटुंबीयांना हुंडा देऊ नका असे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही लग्नाच्या दिवशी वधूपक्षाच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीला कन्यादान देण्याच्या बहाण्याने जे काही असेल ते हुंडा स्वरूपात आणले. शगुनच्या नावावर 1 रुपया मुकेश मीना यांना त्यांच्या नातेवाइकांनी हुंडा प्रथेविरोधात कोणतेही सामान नेऊ नका असे सांगितले होते. हुंड्याच्या नावावर काहीही घेतले नाही, शगुनच्या नावावर 1 रुपया घेतला आणि नारळ घेऊन लग्न केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: marriage
  • First Published :
जाहिरात
जाहिरात