जाहिरात
मराठी बातम्या / Viral / एक फेसबुक पोस्ट आणि लाखोंची मदत! गरीब मुलीचं आयुष्य पालटलं

एक फेसबुक पोस्ट आणि लाखोंची मदत! गरीब मुलीचं आयुष्य पालटलं

आजच्या काळात नातेवाईकही मदत करण्यापासून मागे हटतात, परंतु इंटरनेटच्या माध्यमातून लोक रेश्माच्या मदतीला धावून आले.

आजच्या काळात नातेवाईकही मदत करण्यापासून मागे हटतात, परंतु इंटरनेटच्या माध्यमातून लोक रेश्माच्या मदतीला धावून आले.

अतिशय हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या या कुटुंबाला इंटरनेटच्या माध्यमातून देशभरातून मदतीचा हात मिळाला.

  • -MIN READ Local18 Shivpuri,Madhya Pradesh
  • Last Updated :

सुनील रजक, प्रतिनिधी शिवपुरी, 9 जून : इंटरनेटच्या माध्यमातून सुरू केलेल्या उपक्रमाने एका गरीब कन्येचं घरटं वसवलं. आपल्या मुलीचे हात पिवळे कसे होतील, या चिंतेत तिचे कुटुंबिय अगदी आतापर्यंत होते. परंतु मंगळवारी तिचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. मध्यप्रदेशात अतिशय हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या या कुटुंबाला इंटरनेटच्या माध्यमातून देशभरातून मदतीचा हात मिळाला. काही दिवसांपूर्वी आरती जैन, रुबी राणा, राज बिंदल, इत्यादी समाजसेविका महिला कपडे वाटपासाठी त्याठिकाणी पोहोचल्या होत्या. तेव्हा त्यांना कळलं की, रामूने मुलगी रेश्माचं लग्न ठरवलं आहे, परंतु त्याच्याकडे लग्नासाठी पैसे नाहीत. मग आरती जैन यांनी फेसबुकवर पोस्ट करून लोकांना मदतीचं आवाहन केलं. त्यानंतर मदतीचे अनेक हात पुढे आले.

News18लोकमत
News18लोकमत

काहींनी रेश्माला वॉशिंग मशीन भेट दिली तर, काहींनी कपाट भेट दिले. काहीजणांनी लग्नात जेवणाची व्यवस्था केली, अनेकांनी गुपचूप दानही केलं. सोनिया ब्युटी पार्लरने रेश्माच्या लेहेंग्याची आणि मेकअपची काळजी घेतली. फोटोग्राफीपासून मेहेंदीपर्यंतची व्यवस्था मोफत झाली. अनेकजण साड्या, भांडी आणि इतर भेटवस्तू घेऊन रेश्माकडे आले . Surya Gochar : सावध राहा, नोकरी सुद्धा जाऊ शकते; सूर्यदेव तुमची राशी सोडून ‘या’ राशीत जाणार! आजच्या काळात नातेवाईकही मदत करण्यापासून मागे हटतात, परंतु इंटरनेटच्या माध्यमातून लोक रेश्माच्या मदतीला धावून आले. मोठ्या संख्येने लोकांनी 1100 रुपयांची मदत केली. तर, जानकी सेना संघटनेने पाण्याची व्यवस्था सांभाळली. दरम्यान, रेश्माचे वडील रामू म्हणाले की, ‘इतके हात मदतीसाठी पुढे आले आहेत की, माझ्याकडे कृतज्ञतेचे शब्द नाहीत.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात