JOIN US
मराठी बातम्या / देश / '...अन्यथा भारतात सापडणार दररोज 2,87,000 कोरोना रुग्ण', MIT संशोधकांचा दावा

'...अन्यथा भारतात सापडणार दररोज 2,87,000 कोरोना रुग्ण', MIT संशोधकांचा दावा

लवकरात लवकर कोरोनावर लस न सापडल्यास 2021 मध्ये भारतात दररोज 2.87 लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतील, असा दावा अमेरिकेतील एका संशोधनातून करण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 जुलै : कोरोनाचे संक्रमण जगभरात वाढू लागले आहे. दरम्यान जगभरातील विविध संशोधन संस्था कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरात लवकर कोरोनावर लस न सापडल्यास 2021 मध्ये भारतात दररोज 2.87 लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतील, असा दावा अमेरिकेतील एका संशोधनातून करण्यात आला आहे. अमेरिकेतील मेसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधील संशोधकांनी असा दावा केला आहे की, जर लवकरात लवकर कोरोनावर लस उपलब्ध नाही झाली तर दररोज कोरोनाचे किती पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येतील. या संशोधकांच्या दाव्यामध्ये भारत अग्रकमावर आहे. अमेरिकेच्या एमआयटीमधील या संशोधकांच्या मते कोरोनावर लस न सापडल्यास 2021मध्ये भारतामध्ये दररोज 2,87,000 कोरोनाचे रुग्ण आढळून येतील. भारतापाठोपाठ अमेरिकेचा क्रमांक आहे. मात्र या अंदाजानुसार भारत आणि अमेरिकेमध्ये असणारी तफावत खूप आहे. ठोस व्हॅक्सिन न मिळाल्यास अमेरिकेत दररोज 95,400 रुग्ण आढळून येतील असा दावा केला जात आहे. (हे वाचा- महाराष्ट्राबरोबर या राज्यांचा युजीसीच्या निर्णयाला विरोध, याठिकाणी होणार परीक्षा ) MIT संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार विविध देशांमध्ये खालीलप्रमाणे दररोज कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते- भारत : 2,87,000 अमेरिका :  95,400 दक्षिण आफ्रिक : 20,600 इराण : 17,000 इंडोनेशिया : 13,200 (हे वाचा- पुण्यात कुटुंबाच्या जीवाशी खेळ, चुकीचा कोरोना अहवाल देणाऱ्या प्रयोगशाळेला दणका ) ब्रिटन : 4,200 नायजेरिया : 4000 तुर्की : 4000 फ्रान्स : 3,300 जर्मनी : 3000 84 देशांमधील 4.75 बिलियन लोकांच्या विस्तृत डेटाचा अभ्यास करून हा दावा करण्यात आला आहे. MIT चे प्राध्यापक हाजिर रेहमानदाद, जॉन स्टरमन आणि Phd कँडिडेट Tse Yang Lim यांच्या अहवालानुसार या 10 देशांत 2021 मध्ये कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण सर्वाधिक राहील. (हे वाचा- आणखी एका आत्महत्येनं पुणे हादरलं, पगार न दिल्याने सुपरवायझरची आत्महत्या ) तथापि, त्यांनी नमूद केले की हे अनुमान गृहित चाचणी, वर्तणूक आणि धोरणात्मक प्रतिसादांबद्दल अत्यंत संवेदनशील आहेत आणि संभाव्य जोखमीचे संकेत म्हणूनच त्याकडे पाहता येईल. तसंच यातून भविष्यातील प्रकरणाचा अचूक अंदाज लावता येणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या