जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात कोरोनाबाबत कुटुंबाच्या जीवाशी खेळ, चुकीचा अहवाल देणाऱ्या प्रयोगशाळेला दणका

पुण्यात कोरोनाबाबत कुटुंबाच्या जीवाशी खेळ, चुकीचा अहवाल देणाऱ्या प्रयोगशाळेला दणका

कोरोनावरचं Sputnik V हे औषध सुरक्षित असल्याचा दावा रशिया कायम करत आला आहे.

कोरोनावरचं Sputnik V हे औषध सुरक्षित असल्याचा दावा रशिया कायम करत आला आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच एक संतापजनक घटना समोर आली.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 10 जुलै : पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत चालला आहे. एकट्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच एक संतापजनक घटना समोर आली. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील खानापूर येथील एका कुटुंबातील 3 जणांचे नमुने तपासणीसाठी थायरोकेयर या लॅबमध्ये पाठवले होते. यातील 2 अहवाल पॉझिटिव्ह तर एक अहवाल निगेटिव्ह आला. मात्र कुटुंबियांना संशय आल्याने पुन्हा एनयाव्हीमध्ये चाचणी करण्यात आल्यानंतर तिघांचाही अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे चुकीच्या अहवालामुळे थायरोकेयर प्रयोगशाळेला कोरोना चाचणी करण्यास जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंध केला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात बुधवारी 1618 कोरोना रुग्ण वाढले होते तर गुरुवारी ही संख्या वाढून 1803 वर पोहोचली. यामध्ये पुणे शहर 1032, पिंपरी चिंचवड 573, पुणे ग्रामीण 137 अशी रुग्णांची संख्या आहे. पिंपरी चिंचवडवरील संकट वाढलं पुणे सरासरी वाढ तेवढीच राहिल्याचं दिसत आहे, मात्र पिंपरी चिंचवड रुग्णांची संख्या तीनशेवरून पाचशेवर गेल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सरासरी वाढ पन्नासवरून दीडशेच्या जवळपास पोहोचली आहे, म्हणूनच शहरालगतची 20 गावं पुन्हा सीलबंद केली आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या 34399 तर पुणे शहरातील 25 हजारांवर गेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात