महाराष्ट्राबरोबरच 'या' राज्यांचाही युजीसीच्या निर्णयाला विरोध, तर याठिकाणी परीक्षांची तयारी सुरू

महाराष्ट्राबरोबरच 'या' राज्यांचाही युजीसीच्या निर्णयाला विरोध, तर याठिकाणी परीक्षांची तयारी सुरू

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये देखील गोंधळ सुरू झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 जुलै : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये देखील गोंधळ सुरू झाला. विविध राज्यातील मंत्र्यांनी याबाबत केंद्राबरोबर पत्रव्यवहार करणार असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही राज्यांनी परीक्षांच्या तयारीस सुरुवात केली आहे. यूजीसीने गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी पत्र पाठवत राज्यातील सर्व विद्यापीठांना गाईडलाईन्स पाठवल्या आहेत. अंतिम वर्षांच्या परीक्षा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे निर्देश युजीसीनं दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर पुन्हा एक संभ्रम निर्माण झाला आहे.

30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेता येणार नाही- उदय सामंत

युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी  पत्रकार परिषदेत सांगितलं. उदय सामंत यांनी सांगितलं की, अंतिम वर्षांच्या परीक्षांसदर्भात आम्ही महाराष्ट्रातील सर्व कुलगुरू आणि विविध शैक्षणिक संस्थांचे संचालकांसोबत चर्चा केली. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत येणार नाही, अशा प्रतिक्रिया सर्व कुलगूरू आणि शिक्षण संचालकांनी दिली आहे. त्यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच यूजीसीसोबत पत्रव्यवहार करुनच राज्य सरकारने अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, असंही सामंत यांनी यावेळी नमूद केलं.

(हे वाचा-नेमकं 6.15 वाजता काय घडलं? वाचा विकास दुबेच्या एन्काउंटरची INSIDE STORY)

दरम्यान यासंदर्भात आपात्कालीन समितीची देखील बैठक झाली. यात अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत यूजीसीला पत्र देण्यात आलं होतं. मात्र, तरीही युजीसीनं परीक्षा घ्या, असे आदेश विद्यापीठांना दिले आहेत. अशा शब्दात यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर उदय सामंत यांनी जोरदार टीका केली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची करणार बातचीत

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अशी माहिती दिली की, महाविद्यालये आणि विद्यापीठं यामध्ये होणाऱ्या परीक्षा रद्दच करण्यात याव्या याबाबत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहेत. पंजाबमध्ये कोरोनची पॉझिटिव्ह प्रकरणं वाढू लागली आहेत, त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये यामध्ये सर्वाधिक वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आयुष्याबाबत जोखीम घेण्यास आपण तयार नसल्याची प्रतिक्रिया पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

(हे वाचा-महाकाल मंदिरात विकास दुबेच्या मुसक्या आवळल्या; लेडी सिंघमने सांगितला अटकेचा थरार)

युजीसीने ऑनलाइन परीक्षांचा जो पर्याय दिला आहे तो शक्य नाही आहे, कारण पंजाबमध्ये अधिकतर विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत ज्याच्याकडे इंटरनेट सुविधा नाही आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ज्या इतर सात राज्यांनी युजीसीच्या या निर्णयासंदर्भात विरोध दर्शवला आहे, त्याबाबत बोलताना कॅप्टन अमरिंदर असे म्हणाले की, काँग्रेस सरकार असणारी सर्व राज्यांनी या संदर्भात केंद्राकडे बातचीत करण्याची निर्णय घेतला आहे.

पश्चिम बंगालमध्ये काय परिस्थिती?

या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि राज्यातील विद्यापीठाच्या कुलगुरूंची 15 जुलै रोजी बैठक होणार आहे. विद्यार्थ्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागेल, यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. कोरोना व्हायरसच्या  वाढत्या संक्रमणामुळे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू राज्यातील विद्यापीठांचा करण्याचा विचार आहे, त्याचप्रमाणे दुर्गापुजेदरम्यान देखील कॅम्पस बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी मंगळवारी अशी माहिती दिली होती की, यासंदर्भातील पत्रक विद्यापीठांना पाठवण्यात आले आहे. विद्यापीठांकडून ठरवण्यात येईल की ते कशाप्रकारे परीक्षांचे आयोजन करतील. मुख्यमंत्र्यांशी देखील याबाबत चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

दोन्ही तेलुगू भाषिक राज्ये परीक्षांसाठी सज्ज

तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या दोन्ही राज्यांनी युजीसीच्या गाइडलाइनप्रमाणे परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशने युजीसीच्या गाइडलाइन येण्याआधी विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. मात्र आता अंतिम वर्षाच्या किंवा टर्मिनल सेमिस्टर पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टमध्ये घेण्याबाबत निर्णय होऊ शकतो. राज्याचे शिक्षण मंत्री आदिमुलापू सुरेश यांनी संबधित अधिकाऱ्यांना परीक्षांचे आयोजन करण्याबाबत योजना आखण्याचे आदेश दिले आहेत. विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंकडून देखील आम्ही सल्ला घेत असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली आहे. न्यूज18 ला आंध्र प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी घेतील.

(हे वाचा-मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारचे महत्त्वाचे निर्णय,वाचा तुमचा काय फायदा होणार)

तर तेलंगणामध्ये देखील ऑगस्टमध्ये UG/PG परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात या परीक्षांचे आयोजन राज्य सरकारकडून केले जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीसाठी याबाबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या परवानगी नंतर परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या जातील.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 10, 2020, 8:59 AM IST
Tags: ugc

ताज्या बातम्या