JOIN US
मराठी बातम्या / देश / एअर इंडियाच्या विमानात WWF चा थरार, क्रू मेंबरलाही बेदम मारहाण

एअर इंडियाच्या विमानात WWF चा थरार, क्रू मेंबरलाही बेदम मारहाण

या गोंधळामुळे लंडनला न जाता पुन्हा दिल्ली विमानतळावर विमानाचं लॅण्डिंग करण्यात आलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली: विमानात गैरवर्तन होण्याचे प्रकार वाढले आहेत. दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्समध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या गोंधळामुळे लंडनला न जाता पुन्हा दिल्ली विमानतळावर विमानाचं लॅण्डिंग करण्यात आलं. या प्रकरणी दिल्ली विमानतळ पोलिसांनी तक्रार नोंदवली असून प्रवाशाला विमानतळावरच थांबवण्यात आलं. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार एअर इंडियाचे विमान (AI-111) दिल्लीहून सकाळी 6.35 वाजता उड्डाण केलं. टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच प्रवासी आणि क्रू मेंबरमध्ये वाद झाला.

IPS Anurag Arya: UP मध्ये ज्यांनी माफियांची लावली वाट; कोण आहेत निडर, बेधडक IPS अनुराग आर्य

काही अंतर कापल्यानंतर हा गोंधळ सुरू झाला. त्यामुळे पुन्हा विमान दिल्लीच्या दिशेनं रवाना झालं. दिल्लीत आल्यावर विमानतळ पोलिसांनी गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. क्रू मेंबरने त्या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

आवाज असा की, लोकांनी चक्क पैशाची बंडलं काढली, तब्बल 4 कोटी उडवले PHOTOS

एअर इंडियाच्या वतीने प्रवाशाविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी इंडिगोच्या विमानत मद्यधुंत तरुणाने धिंगाणा घातला होता. त्याने इमरजन्सी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोंधळामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या