मुंबई, 10 एप्रिल: उत्तर प्रदेश हे काही वर्षांआधीपर्यंत माफिया आणि गुंडाराजसाठी प्रसिद्ध होतं. मात्र असेही काही IPS ऑफिसर असतात जे कोणाला न घाबरता अशा गुंड प्रवृत्तीचा नायनाट करण्यात सक्षम भूमिका बजावतात. असेच आहेत IPS अनुराग आर्य. माफिया मुख्तार अन्सारीच्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवून अनुराग आर्य पहिल्यांदाच प्रकाशझोतात आले. IPS अनुराग आर्य यांनी मुख्तार अन्सारीच्या सल्तनतवर पहिला वार वार केला होता. म्हणून आज आम्ही तुम्हाला अनुराग आर्यचे शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी, पोलीस अधिकारी बनण्याची कहाणी सांगणार आहोत. आयपीएस अनुराग आर्य यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेच्या सामान्य इच्छुकांप्रमाणे प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न लहानपणापासून पाहिले नव्हते. एमएस्सी करून त्याला वेगळं काहीतरी करायचं होतं. पण एकेकाळी इंग्रजीची भीती वाटल्याने अनुराग एमएस्सीमध्ये दोन विषयांत नापास झाले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या अनुराग आर्यायांना यामुळे मोठा धक्का बसला. काहीतरी वेगळं करायला हवं असं त्यांना वाटलं. सिंदूर, कपाळावर बिंदी आणि हातात बांगड्या; 16 शृंगार करून ऑफिसला जायचे ‘हे’ IG; पण का? कारण वाचून व्हाल थक्क आयपीएस अनुराग आर्य हे उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील छपरौली या छोट्या गावातील आहेत. ते त्यांची आई डॉ. पूनम आर्य आणि पत्नी वानिका सिंगसोबत राहतात. वनिका सिंग या पीसीएस अधिकारी आहेत. तर आई होमिओपॅथी डॉक्टर आहे. त्याचे वडीलही डॉक्टर आहेत. मात्र लग्नानंतर दोन वर्षांतच आई-वडिलांमध्ये मतभेद झाल्याने विभक्त झाले. अनुराग सहा महिन्यांचा असताना त्यांची आई तिच्या माहेरच्या छपरौली येथे घेऊन गेली होती. अनुराग आर्य यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण गावातीलच सरस्वती शिशु मंदिर शाळेत झाले. यावेळी त्यांना इंग्रजीची भीती वाटत होती. पण त्यानंतर त्यांनी इंग्रजीला आपले शस्त्र बनवले. 2008 मध्ये त्याला डेहराडून येथील इंडियन मिलिटरी स्कूल (IMS) मध्ये प्रवेश मिळाला. या वातावरणात त्यांनी शिस्त आणि इंग्रजी दोन्ही शिकले. व्यक्तिमत्व विकसित झाले. घोडेस्वारी, पर्वतारोहण आणि राफ्टिंग या खेळांमध्ये त्यांनी अनेक पदके जिंकली. त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी घेतली. ISRO मध्ये नोकरी हवीये? मग नक्की काय असतात पात्रतेचे निकष; कसा मिळतो जॉब? A-Z माहिती बीएचयूमधून पदवी घेतल्यानंतर अनुराग आर्यने दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये एमएससीमध्ये प्रवेश घेतला. 2011 मध्ये ते दोन विषयात नापास झाले. याचा त्यांना खूप धक्का बसला. त्यानंतर त्यांनी एमएससीचा अभ्यास सोडला आणि करिअरचा विचार करण्यासाठी थोडा वेळ घेतला. शेवटी ठरवलं की त्याला आयपीएस व्हायचं आहे. 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; पुण्यात इथे होतेय तब्बल 78 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय अडीच वर्षांत चार जिल्ह्यांचे एसपी झाले अनुराग आर्य 2013 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मुख्य परीक्षेत बसला होता. यादरम्यान त्यांची आरबीआयमध्ये व्यवस्थापक पदासाठी निवड झाली. RBI मध्येही नोकरीला रुजू झाले. तसेच कानपूरमध्ये आठ महिने काम केले. याच प्रयत्नात ते आयपीएस झाले. त्यांची रँक 163 होती. त्यानंतर त्यांनी बँकेची नोकरी सोडली.सुरुवातीला अनुराग आर्य अडीच वर्षात चार जिल्ह्यांचे एसपी बनले. ते 6 महिने अमेठी, 4 महिने बलरामपूर, 14 महिने मऊ आणि 5 महिने प्रतापगडमध्ये एसपी होते.
मुख्तार अन्सारीवर मोठी कारवाई IPS अनुराग आर्य यांनी 2019 ते 2020 या कालावधीत मऊ येथे पोस्टिंग दरम्यान मुख्तार अन्सारीच्या टोळीवर कठोर कारवाई केली. अवैध कत्तलखाना चालवणाऱ्या मुख्तार अन्सारी टोळीतील 26 जणांवर गुंडाची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांचा शूटर अनुज कनोजिया याचे घर बुलडोझरने पाडण्यात आले. अनुराग आर्य यांनी 2020 मध्ये मुख्तार अन्सारीविरोधात गुन्हा दाखल केला होता. 2013 नंतर पहिल्यांदाच मुख्तारवर गुन्हा दाखल झाला होता. त्याने मुख्तार अन्सारीच्या काळ्या उत्पन्नाच्या स्त्रोतांवर हल्ला केला आणि त्याच्या गुंडांवर कडक कारवाई केली.