JOIN US
मराठी बातम्या / देश / Air India च्या पायलटकडून DGCA च्या नियमाचं उल्लंघन, विमानातच मैत्रिणी सोबत...

Air India च्या पायलटकडून DGCA च्या नियमाचं उल्लंघन, विमानातच मैत्रिणी सोबत...

Air India: तिला कॉकपिटमध्ये नेलं आणि दिली ‘स्पेशन ट्रिटमेंट’, वैमानिकाविरोधात गुन्हा दाखल

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली : कधी लघूशंका तर कधी मारहाण तर कधी दारू पिऊन धिंगाणे असे प्रकार विमानात घडले असताना आता आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. वारंवार DGCA नं नियम कठोर करूनही आता विमानाच्या पायलटकडून या नियमाला कचऱ्याची टोपली दाखवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. Air India च्या पायलटने आपल्या खास मैत्रिणीला सूट दिली आणि त्यांनी अक्षरश: कॉकपिटचं लिव्हिंग रूम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी पायलटविरोधात आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याच्यावर आरोप आहे की त्याने मैत्रिणीला कॉकपिटमध्ये नेलं. याशिवाय बिजनेस क्लासमधील जेवणही दिलं. तिला नियम मोडून स्पेशल ट्रिटमेंट दिली.

एअर इंडियाच्या पायलटला आपल्या मैत्रिणीला कॉकपिटमध्ये फिरायला घेऊन जाणं चांगलंच महागात पडलं. ही घटना 27 फेब्रुवारी रोजी दुबईहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात घडल्याची माहिती मिळाली आहे. एअर इंडियाच्या पायलटवर आपल्या महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये फिरायला नेल्याप्रकरणी डीजीसीएमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फक्त एका प्रवाशाला घेऊन विमानाने केलं उड्डाण; राजाप्रमाणे केलं वेलकम, विचित्र कारण समोर

हे विमान वाहतूक नियामक महासंचालक नागरी विमान वाहतूक (DGCA) सुरक्षा नियमांचे उल्लंघन आहे ज्या अंतर्गत पायलटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैमानिकावर आरोप आहे की त्याने आपल्या मित्राचे स्वागत करण्यासाठी केबिन क्रूला विशेष सूचना दिल्या होत्या. याशिवाय त्याच्या मित्राला बिझनेस क्लासचे जेवण खाऊ घातल्याचा आरोप आहे.

Shocking! उडत्या विमानात पायलट बेशुद्ध, 1 तास जीव मुठीत धरून हवेत लटकले प्रवाशी; शेवटी…

एअरलाइन्सच्या एका अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एअर इंडियाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. मात्र, एअर इंडियाच्या अधिकार्‍यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या