मराठी बातम्या /बातम्या /Viral /Shocking! उडत्या विमानात पायलट बेशुद्ध, 1 तास जीव मुठीत धरून हवेत लटकले प्रवाशी; शेवटी...

Shocking! उडत्या विमानात पायलट बेशुद्ध, 1 तास जीव मुठीत धरून हवेत लटकले प्रवाशी; शेवटी...

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

विमानात आकाशात उडत असताना पायलटची तब्येत अचानक बिघडली आणि कित्येक प्रवाशांचा जीव टांगणीला लागला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

वॉशिंग्टन, 25 मार्च : रस्त्यावर गाडी चालवताना ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला किंवा तब्येत बिघडल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. रस्ता असल्याने अशावेळी काही ना काही करून जीव वाचवण्यासाठी धडपड तरी करता येते. पण विचार करा, असं काही विमान प्रवासात घडलं तर... कल्पनाही नकोशी वाटते. पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. आकाशात उडत्या विमानात एक पायलट अचानक बेशुद्ध झाला. त्यानंतर कित्येक प्रवाशांचा जीव हवेत लटकला.

अमेरिकेतील ही घटना आहे. साऊथवेस्ट एअरलाइन्सचं प्लेन लास वेगासहून टेक ऑफ झालं होतं. ओहोयोतील कोलंबसला हे विमान जात होतं. विमान आकाशात होतं आणि अचानक प्लेन उडवणाऱ्या पायलटची तब्येत बिघडली आणि तो बुेशुद्ध झाला.

फ्लाइटच्या एका क्रू मेंबरने सांगितलं की पायलटच्या पोटात अचानक वेदना सुरू झाल्या. जवळपास पाच मिनिटांनंतर तो बेशुद्ध झाला. पायलटची तब्येत बिघडल्याची माहिती ट्रॅफिक कंट्रोलला देण्यात आली आणि तात्काळ अॅम्ब्लुयन्सची गरज असल्याचं सांगितलं. अशा परिस्थितीत विमान पुन्हा लास वेगासला आणायला सांगितलं.

विमानात पाणी मागणारे प्रवासी एअर हॉस्टेसना बिलकुल आवडत नाहीत; करतात राग राग कारण...

जवळपास 1 तास 17 मिनिटं विमान हवेतच होतं. आकाशात प्रवाशी जीव मुठीत धरून होते. अखेर एक देवदूत त्यांना वाचवण्यासाठी धावून आला. याच विमानातून एक ऑफ ड्युटी पायलट प्रवास करत होता. जो दुसऱ्या एअरलाइन्समध्ये काम करत होता. पायलट बेशुद्ध झाल्यानंतर तो फ्लाइटच्या डेकमध्ये गेला आणि त्याने विमानाची कमान आपल्या हाती घेतली. फ्लाइटच्या को-पायलटच्या मदतीने या ऑफ ड्युटी पायटलने विमानाचं सुरक्षित लँडिंग केलं. कोणत्याही अडचणीशिवाय ते लास वेगासला परतलं.

को-पायलटच्या मदतीने या ऑफ ड्युटी पायलटने सर्व प्रवाशांचा जीव वाचवला. साऊथेस्ट एअरलाइन्सने ऑफ ड्युटी पायलटचे आभार मानले, ज्याने आपात्कालीन स्थितीत मदतीचं पाऊल उचललं.

OMG! आकाशातून कोसळताच तरुणाने हातात धरलं; विमानाचा कधीच पाहिला नसेल असा Shocking Video

लास वेगासला आल्यानंतर दुसऱ्या पायलटने हे विमान उडवलं आणि प्रवाशांना लास वेगासहून सुरक्षित कोलंबसला पोहोचवलं.

First published:
top videos

    Tags: Airplane, Viral, World news