जाहिरात
मराठी बातम्या / Viral / फक्त एका प्रवाशाला घेऊन विमानाने केलं उड्डाण; राजाप्रमाणे केलं वेलकम, विचित्र कारण समोर

फक्त एका प्रवाशाला घेऊन विमानाने केलं उड्डाण; राजाप्रमाणे केलं वेलकम, विचित्र कारण समोर

airplane

airplane

विमानतळावर पोहोचल्यावर बोर्डिंगच्या ठिकाणी दुसरा एकही प्रवासी नसल्याचं पाहून तो घाबरला. त्याला वाटलं की कदाचित फ्लाइट रद्द झाली असेल किंवा पोहोचायला उशीर झाला असेल. मात्र…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 13 एप्रिल : आजकाल विमानानं प्रवास करणं हे बस आणि ट्रेनने प्रवास करण्यासारखं झालं आहे. देशात आणि जगात लाखो लोक दररोज प्रवास करतात आणि क्वचितच अशी कोणतीही फ्लाइट असेल जी पूर्णपणे भरलेली नसते. सीट बुक करण्यासाठी लोकांची चढाओढ असते. हव्या त्या सीटसाठी लोक जास्तीचे पैसेही देतात. पण ब्रिटनमध्ये आता पूर्ण रिकाम्या विमानात एकाच प्रवाशाने उड्डाण प्रवास केल्याचं समोर आलं आहे. केबिन क्रूच्या 3 सदस्यांशिवाय विमानात दुसरं कोणीही नव्हतं. हे कसं घडलं? चला जाणून घेऊया. पॉल विल्किन्सनला लँकेशायरहून पोर्तुगालला जायचं होतं. पण विमानतळावर पोहोचल्यावर बोर्डिंगच्या ठिकाणी दुसरा एकही प्रवासी नसल्याचं पाहून तो घाबरला. त्याला वाटलं की कदाचित फ्लाइट रद्द झाली असेल किंवा पोहोचायला उशीर झाला असेल. याबाबत सवालही त्यानी कर्मचाऱ्यांना केला. पण त्यांच्या बाजूने आलेले उत्तर ऐकून तो थक्क झाला. बोर्डिंग कर्मचारी म्हणाले, तुम्ही आमचे व्हीआयपी पाहुणे आहात, कारण या विमानात तुमच्याशिवाय दुसरा प्रवासी नाही.

News18लोकमत
News18लोकमत

पॉल तेथून डबल शटल बसमधून विमानात गेला. तिथे केबिन क्रूने त्याचे राजासारखे स्वागत केले. क्रू मेंबर्स त्याला किंग पॉल म्हणत होते. टेकऑफपूर्वी कॅप्टनने त्याच्याशी बोलणंही केलं. सर्वांनी त्याच्यासोबत फोटोही काढले. पॉल म्हणाला, जणू काही मी माझ्या प्रायव्हेट जेटमधून प्रवास करत आहे, असं वाटलं. इतकं प्रेम आणि आदर मिळाला की ज्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. मी कोणत्याही सीटवर प्रवास बसू शकत होतो. कदाचित हे पुन्हा कधीही होणार नाही. लँकेशायरहून पोर्तुगालला जाण्यासाठी प्रायव्हेट जेट घेतल्यास त्याचे भाडे 28,000 पौंड आहे, परंतु पॉलने या 3 तासांच्या फ्लाइटसाठी केवळ 130 पौंड खर्च केले. त्याच्या स्वागतासाठी तीन क्रू मेंबर्स उपस्थित होते. पॉल आल्यावर क्रॅबिन क्रू सदस्य हसत होते. ते त्याला राजा पॉल म्हणत होते. पॉलने म्हटलं, मला वाटलं संपूर्ण विमान माझं आहे. मला पाहिजे ते मी मागू शकतो. मात्र, नंतर मी गंमतीने माझ्या तिकिटाचे पैसे परत मागितले, तेव्हा ते म्हणाले – तुम्ही तर आम्हालाच 2800 पौंड द्यायला पाहिजे. लग्नाच्या स्टेजवरील खेळात नवरीने हरवलं; भडकलेल्या नवरदेवाने दिली भयानक शिक्षा, संतापजनक VIDEO कारण स्पष्ट करताना Jet2 चे प्रवक्ते म्हणाले, “आम्हाला आनंद होत आहे की मिस्टर विल्किन्सन आमच्या विनिंग कस्‍टमर सर्विसचा अनुभव घेऊ शकले. आम्हाला वाटतं की बरेच लोक आधीच सुट्टीसाठी पोर्तुगालला पोहोचले होते. त्यामुळे या विमानात बसण्यासाठी एकही प्रवासी नव्हता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात