JOIN US
मराठी बातम्या / देश / VIDEO '15 कोटी आहोत पण 100 कोटींवर भारी आहोत', वारिस पठाण यांचं चिथावणीखोर भाषण

VIDEO '15 कोटी आहोत पण 100 कोटींवर भारी आहोत', वारिस पठाण यांचं चिथावणीखोर भाषण

इट का जवाब पत्थर से’ हे आता आम्ही शिकलो आहोत. स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्या, अशी वादग्रस्त विधानं वारिस पठाण यांनी जाहीर भाषणात केली आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गुलबर्गा(कर्नाटक), 20 फेब्रुवारी: ‘इट का जवाब पत्थर से’ हे आता आम्ही शिकलो आहोत. स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्या, अशी चिथावणीखोर भाषा वापरत MIM चे नेते वारिस पठाण यांनी वादग्रस्त भाषण केलं. दोन समाजात तेढ निर्माण करू शकतील अशी धक्कादायक विधान पठाण यांच्या भाषणात केली. कर्नाटकातल्या गुलबर्गा इथे वारिस पठाण यांनी जाहीर भाषणात अशी वादग्रस्त विधानं केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (AIMIM)चे नेते वारिस पठाण माजी आमदार आहेत. मुंबईतल्या भायखळा मतदारसंघातून ते गेल्या विधानसभेत निवडून आले होते. CAA च्या विरोधातल्या मोर्चांचा संदर्भ देत ते या भाषणात म्हणाले, “ते म्हणतात आम्ही मुद्दाम स्त्रियांना पुढे केलं. पण विचार करा अजून फक्त आमच्या सिंहिणी पुढे आल्यात तर यांचा घाम निघालाय. आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो तर काय होईल!”, अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्ष धमकी दिली. समोर उपस्थित समुदायाला उद्देशून ते म्हणाले,“आता आपल्याला एकत्र आलं पाहिजे. एकत्रितपणे लढलं पाहिजे. स्वातंत्र्य तर मिळायलाच हवं. मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या. 15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना!”

संबंधित बातम्या

वारिस पठाण यांच्या वादग्रस्त भाषणावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. भाजपच्या वतीने बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “अशी भाषा या वेळी करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. हे अयोग्य आहे. आम्ही पराक्रमी आहोत, असं दाखवायचा हा प्रयत्न असेल तर तो अकारण आहे. कारण नसताना त्यांनी 100 कोटी लोकांचा अवमान करत त्यांना चिथावणी द्यायचं काम केलं आहे. 100 कोटी सहिष्णू आहेत म्हणून. पण वारिस पठाण म्हणतात तसं सगळ्यांनी हिसकावून घ्यायची भाषा केली तर काय होईल?” अन्य बातम्या CM उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार? संभाजी महाराजांना अटकेनंतरचे मालिकेचे भाग दाखवू नये, शिवसेना नेत्याची मागणी लिंगायत मठाधिपतीपदी प्रथमच मुस्लीम मुल्ला; बसवेश्वरांचे आहेत भक्त

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या