संभाजी महाराजांना अटकेनंतरचे मालिकेचे भाग दाखवू नये, शिवसेना नेत्याची मागणी

संभाजी महाराजांना अटकेनंतरचे मालिकेचे भाग दाखवू नये, शिवसेना नेत्याची मागणी

'झी मराठी'वर सुरू असलेली छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील मालिका 'स्वराज्य रक्षक संभाजी' आता वादात सापडण्याची चिन्हं दिसत आहेत.

  • Share this:

औरंगाबाद,20 फेब्रुवारी:'झी मराठी'वर सुरू असलेली छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील मालिका 'स्वराज्य रक्षक संभाजी' आता वादात सापडण्याची चिन्हं दिसत आहेत. संभाजी महाराजांना अटकेनंतरचे मालिकेचे भाग दाखवू नये, अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे.

इतिहास लपवता येत नाही. मात्र संभाजी महाजारांचा ज्या पद्धतीने छळ करून यातना दिल्या गेल्या ते पाहणे आम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू शकण्याची भीतीही अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका आता शेवटच्या टप्प्यात आहे. मालिकेत सध्या संभाजी महाराजांना औरंगाजेबानं कैद केल्याचे दाखवण्यात येत असून यानंतरची दृश्यं पाहाणे मनाला पटणारं नाही, या मालिकेतील असे चित्रीकरण रोखता येईल काय, याबद्दल निर्माते तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही अर्जुन खोतकर यांनी सांगितले आहे. शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमात खोतकर बोलत होते.

अर्जुन खोतकर म्हणाले, शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले कल्याणकारी राज्य ही काळाची गरज आहे. तसेच स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांवरचे जे चित्रण सध्या प्रसारित केले जात ते अत्यंत संवेदनशील आहे.

देवेंद्र फडणवीसांना जामीन मंजूर, गुन्ह्यांची माहिती लपवल्याचं प्रकरण

'स्वराज्यरक्षक संभाजी'वरून उलट सुलट चर्चा..

दरम्यान, ऐतिहासिक मालिका 'स्वराज्यरक्षक संभाजी' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र, ही मालिका राजकीय दबावामुळे बंद करण्यात येत असल्याची उलट सुलट चर्चा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहे. यावर मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले होते. अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे ट्वीट करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.

खासदार अमोल कोल्हे यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसंदर्भात सोशल मीडियावर अनेक पोस्ट फिरत आहेत. टीका करण्यासाठी सरसावलेल्या तथाकथित बोरुबहाद्दरांनी आणि मळमळ असह्य होऊन गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या सोशल मीडिया पंडितांनी मालिका संपूर्ण पाहावी आणि मग प्रेक्षक या नात्याने जरुर टिप्पणी करावी. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच पण मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नाही, अशे कॅप्शन दिले आहे.

'डरते तो वो है...' मोदींचे शब्द वापरत अमृता फडणवीस यांचा VIDEO, गाणं नव्हे नवं वाद्य

'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका 25 सप्टेंबर 2017 पासून सुरु आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश:डोक्यावर घेतलं आहे. या मालिकेने टीआरपीच्या यादीतही टॉप 5 मध्ये आपली जागा मिळवली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मालिकेने 500 एपिसोड पूर्ण केले होते. परंतु, आता फेब्रुवारी महिन्यातच या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राजकीय दबावामुळी ही मालिका बंद केली जाणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2020 02:49 PM IST

ताज्या बातम्या