अहमदाबाद, 20 जुलै : एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे तब्बल 4 महिने लोकं घरांमध्ये कैद आहे. परिणामी सध्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ लोकं घालवत आहे, मात्र यामुळे घरात भांडणंही वाढत आहे. असाच एक अजब प्रकार गुजरातच्या अहमदाबाद येथे घडला. पतीने सरकारी मेडिसिन हेल्पलाइन नंबरवर कॉल करत आपल्या पत्नीची तक्रार केली. ही तक्रार ऐकून डॉक्टरही थक्क झाले. या व्यक्तीने पत्नी दररोज 500 लिटर पाण्याची टाकी रिकामी करते. एवढेच नाही तर ती तीन वेळा संपूर्ण घर धुवून काढते, अशी तक्रार केली. या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितले की, कोरोनाच्या भीतीमुळे त्यांची पत्नी घरातलं सर्व पाणी वापरत आहे. शेजाऱ्यांनीही याबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केल्यानंतर पतीने चक्क हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करत पत्नीची तक्रार केली. हेल्पलाईनवर असलेले मानसोपचारतज्ज्ञ रमाशंकर यादव यांनी सांगितले की, फोनवर बोलताना ही व्यक्ती संतापलेली होती. त्याची बायको कोणालाही घरात येऊ देत नाही. त्यालाही वेगवेगळे नियम पाळण्यास भाग पाडते. पत्नीच्या इच्छेनुसार त्याला आंघोळ करावी लागते, या सगळ्यामुळे वैतागलेल्या पतीने तक्रार करण्यास सुरुवात केली. वाचा- नागपूरच्या कथित हनीट्रॅप ऑडिओ क्लिप प्रकरणाला नवे वळण, साहिल सय्यदला अटक मेडिसिन हेल्पलाइनवर मजेशीर तक्रारी राज्य सरकारने मेमध्ये 1100 मेडिसिन हेल्पलाईन सुरू केल्या. तेव्हापासून आतापर्यंत 12 हजाराहून अधिक लोकांनी हेल्पलाइनवर संपर्क साधला आहे आणि मनोचिकित्सकांचा सल्ला घेतला आहे. हेल्पलाइनचे समन्वयक डॉ. अजय चौहान म्हणाले की लॉकडाऊनच्या काळाच्या तुलनेत आता अशा फोन कॉलची संख्या 50 टक्के आहे. लॉकडाउन चालू होते तोपर्यंत, बहुतेक तक्रारी चिंता आणि कोरोनाबद्दल माहितीसाठी येत आहेत. वाचा- देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 11 लाख पार, 24 तासांत 40 हजार रुग्णांची नोंद दोन लीटर सॅनिटायझरचा करते वापर डॉक्टर म्हणाले की, त्यांना काही दिवसांपूर्वी एक महिला रोज 2 लिटर सॅनिटायझर हातावर लावत असल्यामुळे तिची कातडी फाटल्याची तक्रार आली होती. मानसोपचारतज्ज्ञ डॉ.मृगेश वैष्णव म्हणाले की आजार, मृत्यू यांच्याबाबतची भीती मुख्य कारण आहे. कोरोना टाळण्यासाठी वारंवार हात धुण्यास सांगितले जाते. मात्र बरेच लोकं प्रमाणा बाहेर याचा वापर करतात. अशा परिस्थितीत सुरक्षा उपायांच्या संतुलित वापरासाठी लोकांना समुपदेशन आवश्यक आहे. वाचा- किशोरवयीन मुलांमुळे कोरोनाचा प्रसार होतोय जलद, शास्त्रज्ञांचा चिंताजनक दावा