मराठी बातम्या /बातम्या /देश /

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 11 लाख पार, 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची नोंद

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 11 लाख पार, 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासांत तबब्ल 40 हजार 425 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची ही रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी आहे. तर, 24 तासांत 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    नवी दिल्ली, 20 जुलै : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गेल्या 24 तासांत तबब्ल 40 हजार 425 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वात जास्त आकडेवारी आहे. तर, 24 तासांत 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील कोरोना रुग्णांनी आता 11 लाखांचा आकडा पार केला आहे. सध्या देशात 11 लाख 18 हजार 43 कोरोना रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 3 लाख 90 हजार 459 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 27 हजार 497 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 7 लाख 86 लोक निरोगीही झाले आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 1 कोटी 40 लाख 47 हजार 908 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. रविवारी देशात 2 लाख 56 हजार 39 चाचण्या करण्यात आल्या. तर, देशाचा रिकव्हरी रेट 62.9% झाला आहे. वाचा-किशोरवयीन मुलांमुळे कोरोनाचा प्रसार होतोय जलद, शास्त्रज्ञांचा चिंताजनक दावा वाचा-आणखी एका नेत्याला कोरोनाची बाधा, मुंबईच्या पालकमंत्र्यांचा अहवाल पॉझिटिव्ह मृत्यूदर झाला कमी पहिल्यांदा देशातील मृत्यूदर कमी झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाता मृत्यूदर 2.5 टक्क्यांहून कमी झाला आहे. याआधी रविवारी रिकव्हर झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 04 हजार 043हून अधिक होती. आतापर्यंत एकूण 6 लाख 77 हजारहून अधिक लोकं निरोगी झाले आहे. जगभरात कोरोनाचे थैमान दुसरीकडे जगभरात 213 देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजला आहे. संपूर्ण जगात गेल्या 24 तासांत 2.18 लाख नवीन रुग्ण आढळून आहे. तर, 4 हजार 296 लोकांचा मृत्यू झाला. वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात सध्या 1 कोटी 46 लाखहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, मृतांचा आकडा हा 6 लाखांच्या वर गेला आहे. वाचा-भारत शोधणार COVID-19वर लस, 7 भारतीय कंपन्यांवर सर्व जगाची  लागली नजर!
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या