किशोरवयीन मुलांमुळे कोरोनाचा प्रसार होतोय जलद, शास्त्रज्ञांच्या नव्या दाव्याने वाढवली चिंता

किशोरवयीन मुलांमुळे कोरोनाचा प्रसार होतोय जलद, शास्त्रज्ञांच्या नव्या दाव्याने वाढवली चिंता

शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, कोव्हिड-19चा (Covid-19) प्रसार किशोरवयीन मुलांमुळे जलद होत आहे. दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका प्रयोगात त्यांना हे आढळून आले.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जुलै : जगभरात कोरोनाव्हायरसने (coronavirus) हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. असे असताना शास्त्रज्ञांना कोरोनाबाबत नवनवीन शोध लागत आहे. यातच आता शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, कोव्हिड-19चा (Covid-19) प्रसार किशोरवयीन मुलांमुळे जलद होत आहे. दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका प्रयोगात त्यांना हे आढळून आले.

दक्षिण कोरियातमध्ये सध्या 5706 कोरोना रुग्ण हे 13 ते 19 वयोगटातील आहेत. शास्त्रज्ञांनी 60 हजार लोकांची चाचणी केली. यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की 11.8% रुग्ण हे घरातल्या लोकांमुळेच कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. मुख्य म्हणजे यातील 18.6% रुग्णांमध्ये कोरोनाचा प्रसार हा 10 ते 19 वयोगटातील मुलांमुळे झाला. या वयोगटातील मुलांमुळे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांमध्ये केवळ 10 दिवसांत कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या मते 10 ते 19 या वयोगटामुळे सर्वात जास्त आणि जलद कोरोनाचा प्रसार होत आहे. 10 वर्षांच्या खालच्या वयोगटातील मुलांमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची संख्या कमी आहे.

वाचा-भारत शोधणार COVID-19वर लस, 7 भारतीय कंपन्यांवर सर्व जगाची  लागली नजर!

शाळांनी वर्ग केव्हा व कसे सुरू करावे या विषयीच्या चर्चेवर हा अभ्यास करण्यात आला. शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असले तरी, शाळा सुरू झाल्यानंतर कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकते. याआधी ट्रम्प सरकारने शाळांना सक्त ताकीद देऊन लवकरात लवकरात सुरू करण्यातचे आदेश दिले होते. ट्रम्प यांनी शाळांना मिळणारा निधी रोखण्याचीही धमकी दिली होती.

दुसरीकडे कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं होण्यास सुरुवात झाली आहे. जगभरात एकाच दिवसात 2 लाख 50 हजारहून अधिक रुग्ण सापडले. त्यामुळे अशा परिस्थितीत शाळा सुरू करणे धोक्याचे ठरू शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या आकडेवारीनुसार काही देशांमध्ये असे दिसून येते की मुलांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाणही 2% पेक्षा जास्त आहे.

वाचा-कोरोना वॉर्डमधील धबधबा पाहून रुग्णही झाले हैराण; VIDEO पाहून म्हणाल काय हे?

दक्षिण कोरियाच्या अभ्यासानुसार किशोरवयीन मुले विशेषत: वाहक असू शकतात, जरी संशोधकांनी असे सांगितले आहे की घरातील संपर्कांमध्ये इतर ठिकाणी व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. तरीही, कुटुंबांमध्ये संसर्गाचे उच्च दर पाहता, घरात कोरोनाचा प्रसार मर्यादित कसा करता येईल हे समजण्यासाठी या अभ्यासामध्ये अधिक संशोधन करण्याची मागणी केली जात आहे.

वाचा-लय भारी! ऊस उत्पादनात तयार होणाऱ्या कचऱ्यापासून बनवणार 'बायोमास्क'

Published by: Priyanka Gawde
First published: July 20, 2020, 9:22 AM IST

ताज्या बातम्या