मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

नागपूरच्या कथित हनीट्रॅप ऑडिओ क्लिप प्रकरणाला नवे वळण, साहिल सय्यदला अटक

नागपूरच्या कथित हनीट्रॅप ऑडिओ क्लिप प्रकरणाला नवे वळण, साहिल सय्यदला अटक


एलेक्सिस रुग्णालयातील धमकी प्रकरण आणि वादग्रस्त ऑडिओ क्लिपच्या प्रकरणात साहिल सय्यद फरार होता.

एलेक्सिस रुग्णालयातील धमकी प्रकरण आणि वादग्रस्त ऑडिओ क्लिपच्या प्रकरणात साहिल सय्यद फरार होता.

एलेक्सिस रुग्णालयातील धमकी प्रकरण आणि वादग्रस्त ऑडिओ क्लिपच्या प्रकरणात साहिल सय्यद फरार होता.

    नागपूर, 20 जुलै : नागपूरमध्ये एका कथित हनीट्रॅप ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अखेर या प्रकरणी  साहिल सय्यदला अटक करण्यात आली आहे.एलेक्सिस रुग्णालयातील डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी देऊन साहिल फरार झाला होता. तसंच या ऑडिओ क्लिपमध्ये साहिलचेही संभाषण असल्याचं समोर आले आहे. एलेक्सिस रुग्णालयातील धमकी प्रकरण आणि वादग्रस्त ऑडिओ क्लिपच्या प्रकरणात साहिल सय्यद फरार होता. त्याच्याविरोधात नागपूरच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत साहिलला अटक केली आहे. साहिल हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये खंडणी, धमकीचे गुन्हे दाखल आहे. काय आहे प्रकरण? नागपुरचे महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्लॅन करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. 4 जुलै रोजी एलेक्सिस रुग्णालयात साहिल सय्यद याने महापालिकेच्या एका वादग्रस्त डॉक्टर्सच्या समोर राडा घातला होता. त्याने या रुग्णालयातील डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. एवढंच नाहीतर रुग्णालयाची भिंत पाडण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर एलेक्सिस रुग्णालयाने मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तो फरार झाला. या प्रकरणानंतर भाजपच्या दोन नेत्यांची हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचे नियोजन करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तर या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी हनीट्रॅपप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. हनीट्रॅपप्रकरणातील आरोपी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला दरम्यान,  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले होते. त्याच उत्तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. त्यात त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट सांगितले आहे की, 'या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि तरी तुम्ही परत चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकार कोणत्याही पद्धतीने चौकशी करण्यास तयार असल्याचे गृहमंत्री यांनी म्हटले आहे. तसंच, 'या कोरोनाच्या काळात आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे. पण आपण मात्र एका शुल्लक कारणावरून राजकारण करू पाहत आहात', असा टोलाही अनिल देशमुख यांनी फडणवीस यांना लगावला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Nagpur

    पुढील बातम्या