बेतिया, 4 मे : कोरोनाच्या संकटामुळे (Global epidemic corona) देशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) असणार आहे. यादरम्यान सर्वाधिक त्रास मजूर आणि गरीब वर्गाला सहन करावा लागत आहे. मात्र बेतियामध्ये निराधार आणि गरीबांसाठी तयारी करण्यात आली आहे. येथे सध्या राहुल गांधी चलंत भोजनालय सुरू करण्यात आली आहे. गरीबांना याचा फायदा होत आहे. हे भोजनालय गरीबांसाठी उपयुक्त ठरत आहे. या भोजनालयाच्या माध्यमातून घरी जाऊन लोकांना अन्न पुरवलं जात आहे. अनेकदा एका जागेवर थांबून लोकांना सोशल डिस्टन्सिंगसह जेवू घालतं आहेत. सध्या लालू की रसोई आणि मोदी रसोईही चर्चेत होती. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक व्यतिरिक्त सर्व सेवा बंद असल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. अशापरिस्थिती त्यांच्या जेवणाचे हाल होऊ नये यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. गरजुंना दिलं जातंय अन्न बैरिया प्रखंडचे मझरिया गावाचे निवासी उदय झा कॉग्रेसचे कार्यकर्ता आहेत. लॉकडाऊन लागू झाल्यापासून ते पक्षाचे काम सोडून घरोघरी जाऊन लोकांना जेवण देत आहेत. सकाळी जेवण तयार झाल्यानंतर राहुल गांधी चलंत भोजनालय नावाची एक गाडी गावागावात फिरते आणि गरजुंना भोजन पुरवते. राहुल गांधी यांच्या निर्देशावर सुरू आहे भोजनालय कॉग्रेस नेत्याने सांगितले की राहुल गांधी यांच्या निर्देशावरुन हे भोजनालय सुरू करण्यात आलं आहे. देश कोरोनामुक्त होत नाही तोपर्यंत ही सेवा सुरू राहणार असल्याचे सांगितले. संबंधित - लॉकडाऊननंतर विमान प्रवास नसेल पूर्वीसारखा, तिकीट दर पाहा एकदा …आणि पोलीस ठाण्यातील डान्सचा तो VIDEO झाला व्हायरल, SP ने केली मोठी कारवाई