नवी दिल्ली, 4 एप्रिल : लॉकडाऊनमुळे (Lockdown) विमानक्षेत्र धोक्यात आलं आहे. तब्बल 40 दिवस लॉकडाऊनदरम्यान एकही विमानाने उड्डाण घेतलं नाही. ज्यामुळे विमान कंपन्यांचं कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
अद्याप 14 दिवसांपर्यंत लॉकडाऊन सुरू असणार आहे. यानंतरही सुरळीत होण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एअरपोर्ट संचालिक कंपन्यांनी आपल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे.
मधल्या सीट्स असतील रिकाम्या
विमान सेवा (Air Travel) सुरू झाल्यानंतर विमानांमधील स्वच्छतेशिवाय सोशल डिस्टन्सिंग नियम लागू करण्यात येणार आहे. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी यांनी प्रस्तावित केल्यानुसार जेव्हा एअरलाइन्स सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल तेव्हा मधली सीट रिकामी ठेवावी लागेल. मात्र विमानसेवा देणारी कंपनी असं करित असेल तर त्यांना तिकिटांच्या किंमती वाढवाव्या लागतील. अन्यथा कंपन्यांना नुकसान सहन करावं लागेल. अशा परिस्थिती सेवा सुरू ठेवणं अवघड जाऊ शकतं. त्यामुळे तिकिटांचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काय असतीन नवे दर
दिल्ली-मुंबई (Delhi-Mumbai) या विमानप्रवासातील एका वेळचे दर 5000 रुपयांनी वाढून 9700 पर्यंत पोहोचू शकतो. त्यानुसार दिल्लीतून मुंबईला विमानप्रवासाने येण्यासाठी (एका मार्गाच्या प्रवासाचे) 9700 रुपये आकारले जाऊ शकतात. त्यानुसार दिल्ली-बंगळुरू मार्गावरील तिकीट 5700 रुपयांनी वाढून 11200 रुपये होण्याची शक्यता आहे.
या निमयमांचे पालन करणे आवश्यक
फ्लाइट सुरू झाल्यानंतर दिल्ली एअरपोर्टवर या नियमांचे पालन करणे आवश्यक असेल.
सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर लॉकडाऊननंतरही सुरू राहिल. एअरपोर्टवर सोशल डिस्टन्सिंगसाठी कडक नियम तयार केले जातील.
संबंधित - परप्रांतीय मजूर झाले आक्रमक, पोलिसांवर दगडफेकीचा धक्कादायक VIDEO आला समोर
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.