Home /News /national /

...आणि पोलीस ठाण्यातील डान्सचा तो VIDEO झाला व्हायरल, SP ने केली मोठी कारवाई

...आणि पोलीस ठाण्यातील डान्सचा तो VIDEO झाला व्हायरल, SP ने केली मोठी कारवाई

लॉकडाऊनदरम्यान नियमाचं उल्लंघन करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी शिक्षा म्हणून सपना चौधरीच्या 'तेरी अखियाँ का यो काजल' गाण्यावर डान्स करण्यास सांगितला.

    इटावा, 04 मे : लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. याच दरम्यान पोलिसांनी एका तरुणाला अजब शिक्षा दिली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नियम मोडणाऱ्याला अजब शिक्षा देणं पोलिसाच्याच अंगलट आल्याची माहिती मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर SPवर कारवाई करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील इटावा पोलीस ठाण्यात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला सपना चौधरीच्या गाण्यावर पोलीस ठाण्यात डान्स करायला लावला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी मानसिक स्वास्थ बिघडलेल्या व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता, त्यानंतर या पोलीस कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान नियमाचं उल्लंघन करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी शिक्षा म्हणून सपना चौधरीच्या 'तेरी अखियाँ का यो काजल' गाण्यावर डान्स करण्यास सांगितला. त्याच्या डान्सचा व्हिडीओ रेकॉर्डकरून व्हायरल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्या डान्सचा आनंद घेत असल्याचे या व्हायरल व्हिडीओमधून दिसत आहे. हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. 9.3 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 47 जणांनी रिट्वीट केला असून 41 जणांनी कमेंट्स केल्या आहेत. हे वाचा-चक्क माकडाच्या पिल्लानं चिमुकल्याला फरफटत नेलं, पाहा VIDEO हे वाचा-VIDEO:आम्हाला तुमचा अभिमान आहे!'कोरोना योद्धा' डॉक्टरचं घरी असं झालं स्वागत संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Up Police, Uttar pradesh, Viral video.

    पुढील बातम्या