JOIN US
मराठी बातम्या / देश / IAS Success Story: प्रेमात धोका मिळाल्यावर IAS व्हायचं ठरवलं आणि करून दाखवलं, वाचा रिअल लाइफ 'सत्तू'ची कहाणी

IAS Success Story: प्रेमात धोका मिळाल्यावर IAS व्हायचं ठरवलं आणि करून दाखवलं, वाचा रिअल लाइफ 'सत्तू'ची कहाणी

आदित्यने तीनदा यूपीएससी परीक्षा दिली. फिलॉसॉफी हा त्याचा ऑप्शनल विषय होता. तो UPSC रिझल्ट 2021 मध्ये फक्त 2.5 गुणांनी नापास झाला.

जाहिरात

आदित्य पांडे सक्सेस स्टोरी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

2017 मध्ये रिलीज झालेला ‘शादी में जरूर आना’ हा चित्रपट तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता. यामध्ये अभिनेता राजकुमार राव याने सत्तू नावाच्या एका मुलाची भूमिका साकारली होती. तो त्याचे लग्न मोडल्यानंतर सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी अधिकारी बनतो. ही होती चित्रपटाची कहाणी, पण आपल्या खऱ्या आयुष्यातही असे अनेक सत्तू आहेत. ज्यांनी प्रेमात धोका मिळाल्यानंतर आयएएस किंवा आयपीएस बनून दाखवलं. बिहारची राजधानी पाटणा येथील रहिवासी असलेल्या आदित्य पांडेची कथा खूप प्रेरणादायी आहे. आदित्य 10 वीमध्ये असताना त्याचं ब्रेकअप झालं, तेव्हा त्याने खचून न जाता आयएएस व्हायचं ठरवलं. आदित्यने यूपीएससी परीक्षा पास करून सरकारी नोकरी मिळवायचं ठरवलं. त्याने जे ठरवलं ते करूनही दाखवलं आणि तो 2022 मध्ये परीक्षा पास करून आयएएस झाला. 10वी मध्ये एक्स गर्लफ्रेंडला दिलेला शब्द आदित्य पांडेचा जन्म बिहारमधील पाटणा येथील विशुनपूर पकरी या छोट्याशा गावात झाला. त्याने पाटणामधील कंकरबाग येथील केंद्रीय विद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 8वी आणि 9वीत टॉप करणाऱ्या आदित्यची 10वीत एक गर्लफ्रेंड होती. तिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तो खूप निराश झाला होता. तेव्हा त्याने त्या मुलीला म्हटलं होतं की तो एक दिवस आयएएस अधिकारी बनून दाखवेल. IIT मधून केलं MBA आदित्य पांडेने एलपीयू, पंजाबमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये इंजिनीअरिंगची डिग्री घेतली. त्याला इंजिनीअरिंगमध्ये अजिबात रस नव्हता म्हणून त्याने 2018 मध्ये आयआयटी रुरकीमधून एमबीए केलं. त्यानंतर आयसीआयसीआय बँकेत काम करून कॉर्पोरेट क्षेत्र समजून घेतलं. 2019 मध्ये बँकेच्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्याने जानेवारी 2020 पासून UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 2.5 गुणांनी झाला फेल आदित्यने तीनदा यूपीएससी परीक्षा दिली. फिलॉसॉफी हा त्याचा ऑप्शनल विषय होता. तो UPSC रिझल्ट 2021 मध्ये फक्त 2.5 गुणांनी नापास झाला. त्याने पुढील वेळी खूप मेहनत घेतली आणि UPSC रिझल्ट 2022 मध्ये 48 व्या क्रमांकासह उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी बनला. एकदा त्याच्या एका शिक्षकाने त्याच्या वडिलांना म्हटलं होतं की जर हा मुलगा शिकला तर ते त्यांच्या मिशा उतरवतील. आता ते शिक्षक काय करतील हे पहायला हवं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या