JOIN US
मराठी बातम्या / देश / 535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारा ट्रक रस्त्यातच बंद पडला, पाहताच लोकांनी गर्दी केली अन् मग...

535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारा ट्रक रस्त्यातच बंद पडला, पाहताच लोकांनी गर्दी केली अन् मग...

चेन्नई येथून दोन ट्रक रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) रोकड घेऊन जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले. दरम्यान, वाटेत एका ट्रकचे इंजिन बिघडले. या भोवती मोठी गर्दी जमू लागली

जाहिरात

कॅश घेऊन जाणारा ट्रक रस्त्यातच बंद पडला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई 18 मे : तामिळनाडूतील चेन्नईमध्ये 535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये रस्त्यातच बिघाड झाला. बुधवारी या प्रकरणाची माहिती क्रोमपेट पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना मिळालेल्या कॉलमध्ये असा दावा करण्यात आला, की ‘535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारं वाहन विल्लुपुरमच्या दिशेने जाताना रस्त्यातच बंद पडलं. यासाठी पोलीस संरक्षण आवश्यक आहे.’ या प्रकरणाची माहिती मिळताच क्रोमपेट पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी एक ट्रक उभा असल्याचे पोलिसांना दिसले. यावेळी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करत वाहनातील लोकांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. ट्रकच्या आसपास पोलीस पोहोचल्यावर लोकांनीही आपापले अंदाज बांधायला सुरुवात केली. रस्त्यावर लोकांची गर्दी होऊ लागली. नशीब असावं तर अस्सं…2 हजारात केलं होतं खरेदी; आता 50 लाखांहून अधिक किंमतीला विकलं तांबरमचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवासन हेही पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. चेन्नई येथून दोन ट्रक रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) रोकड घेऊन जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले. दरम्यान, वाटेत एका ट्रकचे इंजिन बिघडले. या भोवती मोठी गर्दी जमू लागली. यादरम्यान रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. ट्रकमधून धूर निघू लागल्याचं सांगण्यात आलं, त्यानंतर तपासणी केली असता इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं आढळून आलं. दोन्ही ट्रकच्या आजूबाजूला मोठा जमाव असल्याचं पाहून पोलिसांनी तातडीने दोन्ही ट्रक जवळच्या कॅम्पसमध्ये नेले. यादरम्यान ट्रकचं इंजिन दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिकला पाचारण करण्यात आलं, मात्र ट्रक दुरुस्त होऊ शकला नाही. शेवटी, दोन्ही ट्रक दुसऱ्या वाहनाच्या साहाय्याने परत ओढून आरबीआयकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या