जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नशीब असावं तर अस्सं...2 हजारात केलं होतं खरेदी; आता 50 लाखांहून अधिक किंमतीला विकलं

नशीब असावं तर अस्सं...2 हजारात केलं होतं खरेदी; आता 50 लाखांहून अधिक किंमतीला विकलं

तुमच्याकडे पैसे आले तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न कोणालाही विचारला तर लोक काय उत्तर देतील? ट्रीपला जाऊ, चांगले ब्रँडेड कपडे घेऊ, सर्वात महागडी कार, बंगला घेऊ, महागडी दारु पिऊ, पबला जाऊ, नोकर चाकर ठेवू असा विचार करतात. तसे पाहाता माणसाला कितीही पैसे द्या, त्याच्यासाठी तो कमीच असतो. पण माणसाचा शॉक मात्र माणसाला काहीही करायला भाग पाडू शकतो.

तुमच्याकडे पैसे आले तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न कोणालाही विचारला तर लोक काय उत्तर देतील? ट्रीपला जाऊ, चांगले ब्रँडेड कपडे घेऊ, सर्वात महागडी कार, बंगला घेऊ, महागडी दारु पिऊ, पबला जाऊ, नोकर चाकर ठेवू असा विचार करतात. तसे पाहाता माणसाला कितीही पैसे द्या, त्याच्यासाठी तो कमीच असतो. पण माणसाचा शॉक मात्र माणसाला काहीही करायला भाग पाडू शकतो.

कोणचं नशीब कधी चमकेल, एखाद्याच्या आयुष्यात कधी काय घडेल, हे काही सांगता येत नाही.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 17 मे : कोणचं नशीब कधी चमकेल, एखाद्याच्या आयुष्यात कधी काय घडेल, हे काही सांगता येत नाही. अनेकजण श्रीमंत होण्याची स्वप्नं पाहतात; पण अनेकदा त्यांच्या पदरी निराशाच येते. प्रत्यक्ष काही लोकांबाबत असं घडतं की, त्यावर लवकर विश्वास बसत नाही. आता हेच पहा ना, एका व्यक्तीचं नशीब रातोरात पलटलं. अवघ्या 2000 रुपयांना विकत घेतलेली वस्तू त्यानं 51.50 लाखांना विकली. ही वस्तू अत्यंत मौल्यवान असल्यानं तिला लाखमोलाची किंमत मिळाली. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय. ब्रिटनमधील एका व्यक्तीनं दुकानातून सुंदर नक्षीकाम केलेली दोन चिनी मातीची भांडी खरेदी केली होती. अवघ्या दोन हजार रुपयांमध्ये त्याने ही दोन भांडी खरेदी केली होती; पण आता याच भांड्यांमुळे तो लखपती झाला आहे. मिरर यूकेच्या वृत्तानुसार, भांडी विकत घेतलेल्या व्यक्तीची ओळख उघड झालेली नाही. काही काळापूर्वी त्याने लंडनमधील एका चॅरिटी शॉपमधून ही भांडी विकत घेतली होती. आता ही भांडी 50,000 पाउंड म्हणजे जवळपास 51.50 लाख रुपयांना विकली जातील. 6 वर्षाचा मुलगा यूट्यूबवर पाहून शिकला कार, 3 वर्षाच्या भावाला घेऊन निघाला आणि….. भांड्यांची किंमत कळाली आणि… याबाबत संबंधित भांड्यांची अवघ्या 2000 रुपयांना खरेदी केलेल्या व्यक्तीनं सांगितलं की, ‘चिनी मातीपासून तयार केलेली ही भांडी इतक्या महागात विकली जातील, हे मला माहिती नव्हतं. एकेदिवशी मी लिलाव करणाऱ्यांशी बोललो, तेव्हा मला याची माहिती मिळाली. या भांड्यांची किंमत 51 लाख 50 हजार रुपये आहे.’ म्हणून आहे या दोन भांड्यांना किंमत खरं तर, या भांड्यांना ऐतिहासिक महत्त्व असल्याचं समोर आलं आहे. ही भांडी 18 व्या शतकातील असून, ती चीनच्या राजघराण्याशी संबंधित आहेत. 4.5 इंच उंचीचे हे जार असून, ते राजवंशाच्या शाही भट्ट्यांमध्ये तयार करण्यात आले होते. या भांड्यांवर लाल, पिवळ्या, निळ्या फुलांचं तसंच पानांचे अतिशय नाजूक आणि सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. किंग राजवंश हा चीनचा शेवटचा राजवंश होता. त्याने 1644 ते 1912 पर्यंत चीनवर राज्य केलं. त्याच्या कालखंडात या भांड्यांचा वापर करण्यात आल्याचा दावा केला जातोय. दरम्यान, नशीब बदलायला वेळ लागत नाही असं म्हणतात. आयुष्यात कधी आणि काय घडू शकेल, हे काही सांगता येत नाही. असंच काहीसं ब्रिटनच्या या व्यक्तीबाबत घडलं आहे. अवघ्या दोन हजार रुपयांना खरेदी केलेल्या भांड्यांनी त्याला रातोरात लखपती बनवलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: money
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात